Nagpur : विद्युत केबलमुळे रखडले रस्त्याचे काम

Road
RoadTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : मोक्षधाम चौक ते बसस्थानक चौक या बांधकामाधीन रस्त्याचे काम पुन्हा एकदा रखडले आहे. या मार्गावरील विद्युत खांब व भूमिगत विद्युत तारा काढण्यात आल्या नसल्यामुळे बांधकाम खोळंबली आहेत.

Road
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने विद्युत केबल काढण्यास असमर्थता दर्शवली असून निधी नसल्याचे सांगितले आहे. तसेच महापालिकेकडून विद्युत केबल व खांब हटविण्यासाठी 74 लाखांची मागणीही करण्यात आली होती. महापालिका ही रक्कम उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. जेव्हा निधी उपलब्ध होईल, तेव्हाच वीज काढून या रस्त्याचे काम पूर्ण होईल. नोव्हेंबर 2022 मध्ये मोक्षधाम चौक ते बस स्टँड चौक या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. सुमारे 100 मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम सुरू होताच या मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. आताही या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या एका भागात फुटपाथ तयार करण्यात अडथळा येत आहे.

Road
Nagpur : 21 वर्षात आदिवासी संग्रहालयाचे का नाही झाले काम पूर्ण?

4 प्रकल्पांपैकी 1 प्रकल्प रस्ता बांधकामाचा 

9 कोटी खर्चाच्या बांधकामाधीन 4 प्रकल्पांपैकी पहिला मोक्षधाम चौक बसस्थानक चौकाचा सिमेंट रस्ता, दुसरा सेंटर पॉइंट रस्ता, तिसरा गोरेवाडा रस्ता आणि चौथा ईश्वर नगर रस्ता आहे. मोक्षधाम चौक रस्त्याचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Road
Nagpur: दवलामेटी ग्रामपंचायतीचा मुख्यमंत्र्यांनी का केला गौरव?

रस्ता लवकरच तयार होईल

मोक्षधाम चौक ते एसटी स्टँड चौक या सिमेंट रस्त्याचे काम नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आले. या कामाचे कंत्राट जे. पी. कंस्ट्रक्शन कंपनी ला दिले आहे. या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. विद्युत केबलमुळे रस्त्याचा काही भाग व फूटपाथ बांधणे बाकी आहे. विद्युत तारा हटविल्यास लवकरच हा रस्ता पूर्णपणे तयार होईल. अशी माहिती महापालिका चे प्रकल्प अधिकारी गौतम राजू यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com