Devendra Fadnavis : कोण म्हणतं हिरा उद्योग मुंबईतून सुरतला गेला?

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : मुंबई (Mumbai) शहरातून सुरतला (Surat) हिरा उद्योग (Diamond Industry) गेल्याची चर्चा होत आहे, मात्र मुंबईतून एकही उद्योग सुरतला गेलेला नाही. एकही उद्योग सुरतला जाणार नसल्याचे मुंबई हिरा उद्योग संघानेही स्पष्ट केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात दिली.

Nagpur
Bacchu Kadu : दादा भुसे अन् झेडपीचा बच्चू कडूंनी रात्री पावणेबारालाच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

फडणवीस म्हणाले, सरकारने प्रयत्न केल्यामुळे मुंबईतून हिरा निर्यात सुरतपेक्षा कितीतरी पटीने वाढून ९७ टक्के झाली आहे. तर सुरतची निर्यात सध्या 2.57 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जेम्स ॲण्ड ज्वेलरीसाठी मुंबई शहरात आधुनिक पार्क तयार करण्यात येत आहे. त्यासाठी ३० एकर जागा महापे औद्योगिक वसाहतीमध्ये देण्यात येणार आहे. मध्यंतरी यू.ए.ई व भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला. त्यानुसार मुंबईत मोठा उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

मुंबईत हिरा उद्योगात मलबार गोल्ड १७०० कोटी गुंतवणूक करीत असून, तुर्की डायमंड, तनिष्कदेखील गुंतवणूक करणार आहे. मलबार गोल्ड कंपनी तर देशाचे मुख्यालय मुंबईत करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Nagpur
तानाजी सावंतांना 'दणका'

पोलिसांसाठी ३०० टेंडर प्रसिद्ध
पोलिसांसाठी आतापर्यंत 4078 प्रकल्प हस्तांतरित झालेले असून, 6453 निवासी/अनिवासी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 300 प्रकल्पांसाठी टेंडर प्रसिद्ध झाले असून, 4541 प्रकल्प टेंडरस्तरावरील प्राधान्य मिळालेले तर, 21,148 प्रकल्प नियोजनस्तरावर आहेत. 187 पोलिस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती, 305 सेवा निवासस्थाने प्राधान्यक्रम यादीस सरकारची मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सीसीटीव्ही टप्पा 1 मध्ये 5260 कॅमेरे लावले असून, अमरावती, नांदेड येथे टप्पा-2 हाती घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com