Nagpur
NagpurTendernama

Devendra Fadnavis : 684 कोटी खर्चून नागपुरात उभा राहणार 'हा' जागतिक दर्जाचा प्रकल्प

Published on

नागपूर (Nagpur) : नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडासुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत. यासाठी 684 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाहीर केले. 

Nagpur
Mumbai : विधानसभा निवडणुकीआधी म्हाडाची 'एवढ्या' घरांसाठी बंपर सोडत

मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्राच्या बांधकामाचे कोनशीला अनावरण आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. 

बालेवाडीसारख्या क्रीडा सुविधा व प्रशिक्षण नागपुरात मिळव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आता या क्रीडा केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडासुविधा व प्रशिक्षण आपल्याला देता येईल. विदर्भातील खेळाडूंना त्यांच्या आवडत्या खेळामध्ये रुची वाढावी, त्यांच्या मनातील आधुनिक दालने इथे व्हावीत अशी आमची भूमिका आहे.

करायचे तर वर्डक्लास हवे हा आम्ही आग्रह ठेवला असून सर्व प्रकारच्या सुविधा व प्रशिक्षण आम्ही या नवीन क्रीडा केंद्राच्या माध्यमातून देऊ असे फडणवीस यांनी सांगितले. 

Nagpur
Mumbai : ‘त्या’ 21 किलोमीटर लांब जलबोगद्याचा ऑक्टोबरमध्ये नारळ फुटणार; 5,500 कोटींचे बजेट

आधुनिक स्पोर्ट्स सुविधेसाठी नवा आयाम केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला. नागपूरचे, विदर्भातील घडणारे खेळाडू आपल्या देशाचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, स्वप्नवत वाटेल असे हे केंद्र असणार असून नागपुरसाठी ऐतिहासिक दिवस आहे. खेळातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडते, तसा विकास होतो असे ते म्हणाले. 

या संपूर्ण क्रीडा केंद्राची जागा लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रूफटॉपवर सौर पॅनलद्वारे ऊर्जा निर्मिती याठिकाणी आपल्याला करता येईल. शिवाय परिसरात झाडांच्या लागवडीतून हा परिसर अधिक निसर्गपूरक आपल्याला करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Nagpur
Tender Scam : बीएमसीच्या 4 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाच्या टेंडरमध्ये घोळ; विशिष्ट कंपनीसाठी रेडकार्पेट

असे असेल क्रीडा केंद्र

450 बेड (मुला-मुलींसाठी) होस्टेल सुविधा, अद्ययावत जिमनॅशियम सुविधा, प्रशासकीय इमारत, संकुलात येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसाठी अल्पोपहार व भोजन व्यवस्थेसाठी कॅफेटेरीया सुविधा, सर्व सुविधांसाठी आऊटडोअर व इनडोअर लाईटिंग सिस्टिम, सर्व क्रीडा सुविधांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य, रेनवॉटर हारवेस्टिंग, ग्रीन बिल्डींग रिक्वारमेंट फॅसिलीटी, सिवेज ट्रीटमेंट प्लान, लॅन्डस्केपींग इत्यादी सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत.

या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे, नवोदित खेळाडू व पालकांना क्रीडा क्षेत्राबाबत सामुपदेशन व मार्गदर्शन सुविधा, क्रीडापटू घडवण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी व सुविधा उपलब्ध होतील. पुढील 3 वर्षांत हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

Tendernama
www.tendernama.com