नागपुरात 'सायकल शेअरिंग'साठी 2 कंपन्यांशी करार

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : कार आणि दुचाक्यांच्या वेगात दुर्मिळ होत चाललेली सायकल आता नागपुरकरांना भाड्याने मिळू शकणार आहे. शहरातील प्रदूषण कमी व्हावे आणि सायकल चालवण्याची नागरिकांना सवय लागावी यासाठी नागपूर महानगर पालिका, महामेट्रोने सायकल शेअररिंगला (Cycle Sharing) प्रात्सोहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन खाजगी कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. या कंपन्या नागरिकांना सायकली उपलब्ध करून देणार आहेत.

Nagpur
दस्तनोंदणीच्या समाधानापेक्षा मनस्तापच जास्त; चिरिमिरीशिवाय...

महापालिका व महामेट्रो त्यासाठी सायकलींचे पार्किंग स्टँड उपलब्ध करून देणार आहेत. मोबाईल ॲपद्वारे सायकलसाठी नोंदणी करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पैसे द्यावे लागणार आहे. ऑपरेटर कंपन्यांकडून सायकलचे भाडे आकारण्यात येईल. सध्या लावण्यात आलेले सायकल स्टँड हे प्रत्येक सायकलसाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे सध्याचे सायकल स्टँडचे डिझाईन बदलविण्याची सूचना 'बायसिकल मेयर' डॉ. अमित समर्थ यांनी केली. नागरिकांना सहजरित्या सायकल उपलब्ध व्हावी, त्यांना जवळच्या ठिकाणाहून शहरातील कोणत्याही भागात जाता यावे, यासाठी आकर्षक सायकल स्टँड उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे समर्थ यांनी स्पष्ट केले.

Nagpur
रेल्वेची थर्ड लाईन करणार १६०० कुटुंबांना बेघर

येथे उभारणार सायकल पार्किंग स्टँड
- शासकिय, निमशासकिय, खाजगी कार्यालये, रहिवासी एरिया, शॉपिंग मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स, बाजार, मेट्रो स्टेशन्स, बस स्टँड, उद्याने, पार्क, सार्वजनिक स्थाने.
- सायकल नोंदणीसाठी ॲप तयार करणार
- ऑनलाईन पेमेंट सुविधा
- ऑपरेटर कंपन्या सायकलचे भाडे आकारणार
- पार्किंग निःशुल्क

Nagpur
नागपूरला अनधिकृत बांधकामाचा पुन्हा विळखा

आयुक्तांचे निर्देश
सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसरातही सायकल स्टँड उभारण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून त्यांच्यकडून उपलब्ध जागेची माहिती घेऊन तिथे हे स्टँड उभारण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com