'श्रीराम अर्बन'ला ग्राहक आयोगाचा दणका; व्याज नाकारणे भोवले

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : व्यापारी प्रथेचा अवलंब करीत ग्राहकाला दोषपूर्ण सेवा दिल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission) श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीला (Shriram Urban Cooperative Society) जोरदार दणका देत ग्राहकाला व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले. ज्येष्ठ नागरिक असलेल्या केशव भांडारकर या ग्राहकाने ही तक्रार केली होती.

Nagpur
टक्केवारीचे 'हात धुण्यासाठी' १६० कोटींच्या टनेल लॉंड्रीचा घाट?

तक्रारीनुसार, भांडारकर यांनी श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे मासिक तत्त्वानुसार मुदत ठेवीवर व्याज मिळविण्यासाठी १२ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, तक्रारदार जेव्हा सोसायटीमध्ये व्याज घेण्याकरिता गेले असता त्यांना मासिक व्याजाची रक्कम मिळाली नाही. व्यवस्थापनाकडून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Nagpur
आधी घेतला आक्षेप आता मागीतले टेंडर; पशुसंवर्धन विभागाचा अजब कारभार

परिणामी तक्रारदाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात अर्ज दाखल केला. आयोगाने श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापकासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. मात्र, नोटीस प्राप्त होऊनही प्रतिवादींनी आयोगासमक्ष हजर न झाल्यामुळे प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आयोगाने आदेश दिले. त्यानुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष अजने यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

Nagpur
'या' निर्णयामुळे क्रुझ टुरिझमला येणार 'अच्छे दिन'

श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीने तक्रारदाराला व्याजासह तीस दिवसांमध्ये रक्कम परत करण्याचे आयोगाने आदेश दिले. तसेच, तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये व तक्रारीचा खर्च २० हजार रुपये देण्याचेही सोसायटीला आदेश दिले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com