Nagpur : काँग्रेसचा एनआयटीवर हल्लाबोल कारण...

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : शहरातील विविध समस्यांच्या निवारणासाठी आता काँग्रेस पक्ष सक्रिय झाला आहे. मोर्चे काढून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. नागपूर महापालिकेवर धडक दिल्यानंतर आता शहर काँग्रेसने एनआयटीवर हल्लाबोल केला. एनआयटीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करून प्रदर्शन केले. गुंठेवारी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 1900 ले-आऊटमधील विकासकामे रखडली आहेत. एनआयटीचे बगीचे व मैदानांची दुरवस्था झाली आहे आदी प्रश्नांकडे सभापतींचे लक्ष वेधण्यात आले.

Nagpur
Mumbai : MMRमध्ये नव्या 'ॲक्सेस कंट्रोल' मार्गाची चाचपणी; मुंबईसह कोठूनही 15 मिनिटात बाहेर पडणे शक्य

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रदेश सरचिटणीस अतुल कोटेचा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, बंटी शेळके, गिरीश पांडव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एनआयटी कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने एनआयटी सभापती संजय मीना यांना शहरातील विविध समस्यांचे निवेदन देत चर्चा केली. यावेळी आमदर विकास ठाकरे यांनी सांगितले की, एनआयटीने 1900 ले-आऊट नियमित करताना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विकास शुल्कापोटी कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. 

Nagpur
Nagpur : आता कायद्याचे हातच नव्हे तर डोळेही अधिक सक्षम, असे का म्हणाले फडणवीस?

पण या ले-आऊटमधील पायाभूत सुविधांची कामे रखडली आहेत. बहुतांश ले आऊटमध्ये रस्ते, गटार, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेथे दहा वर्षांपूर्वी रस्ते केले त्यांची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. एनआयटीच्या मोकळ्या मैदानांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. संबंधित अतिक्रमण काढून मौदानांना सुरक्षा भिंत बांधावी, तसेच सौंदर्गीकरण करणे आवश्यक आहे. बगिच्यांची दुरवस्था झाली आहे. खेळणी तुटली आहेत. याकडे नासुप्रचे लक्ष नाही. एनआयटीचे काही प्रकल्प अर्धवट झाले आहेत. ते पूर्ण करण्याची गरज आमदार ठाकरे यांनी व्यक्त केली. झिंगाबाई टाकळी, दाभा, गोरेवाडा, नारा, नारी आदी भागात मंजूर नसलेल्या ले-आऊटमध्ये गरजू नागरिकांनी 15 ते 20 वर्षांपूर्वी घरे बांधली आहेत. एनआयटी च्या जागेवर आरक्षण आहे, असे सांगते. आता लोकांनी घरे बांधली. त्यामुळे संबंधित जागेचे आरक्षण वगळण्यासाठी 37 ची कारवाई करून त्यांची घरे नियमित करा व त्यांना भूखंडांचे आरएल द्या, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली. सामान्य माणूस आपल्या भूखंडांचे आरएल काढण्यासाठी, बांधकामाचा नकाशा मंजूर करण्यासाठी एनआयटीकडे अर्ज करतो. मात्र, तेथील अधिकारी त्याची अडवणूक करतात. विविध नियमांचे दाखले देत हेलपाटे मारायला बाध्य करतात. पण दलालामार्फत लक्ष्मीदर्शन केले की काम त्वरित होते. त्यामुळे नासुप्रमधील दलालांना रोखा, दलाल पोसणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com