Nagpur : PWD विभागातच जुंपली; ठेकेदारांप्रमाणे कामांची पळवापळवी

PWD
PWDTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांमध्ये वाद चांगलेच विकोपाला गेले असून, आता कंत्राटदारांप्रमाणे एकमेकांचे कामांचीही पळवापळवी येथे सुरू झाली आहे. सध्या रविनगर शाखेची देखभाल दुरुस्ती कोणी करायची यावरून दोन अभियंत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हे प्रकरण आता प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

PWD
Nashik : अजबच! वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईऐवजी सात कोटींची कृपा

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामाच्या नियोजनासाठी चार उपविभाग तयार केले आहेत. कोणी कुठली कामे करायची याचे वाटप निश्चित केले आहे. याबाबत कुठलेही नियम नसले तरी परंपरा म्हणून ते पाळले जात आहे. बदल्यांमुळे अभियंत्यांचे झोन सातत्याने बदलत असतात. त्यामुळे कोणी कोणाच्या कामात फारशी ढवळाढवळ करीत नाही. आपआपल्या झोनची जबाबदारी ते सांभाळत असतात. आता मात्र कामेच पळवण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. रविनगर शाखेची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मागील ४५ वर्षांपासून उपविभाग क्रमांक चारकडे आहे. मात्र आता क्रमांक एकच्या उपविभागाने यावर दावा केला आहे. रविनगर शासकीय वसाहतीचा कारभार आपल्याकडे देण्यात यावा अशी मागणी झोन क्रमांक एकने केली होती. त्यानुसार मुख्यअभियंत्यांनी मान्य करून तसे आदेशही काढले आहे. झोन क्रमांक एककडे विधानभवन, रविभवन, नागभवन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यंचे बंगल्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे आधीपासूनच आहेत. असे असताना रविभवन कशाला हवे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

PWD
Nagpur : परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी एजन्सी अन् सरकार खिसे भरतेय का?

हिवाळी अधिवेशनात झोन क्रमांक सर्वाधिक चर्चेत असतो. कोट्‍यवधी रुपये अधिवेशनासाठी येत असातत. ते कसे खर्च होतात आणि कामे कशी होतात याच्या रंगतदार बातम्या दरवर्षीच येतात. त्यातुलनेत इतर झोनला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे झोन क्रमांक एकची जबाबदारी मिळावी यासाठी प्रत्येक अभियंत्यांमध्ये चुरस असते. मात्र झोन क्रमांक एकच्या उपभियंत्यांना आहे ती कामे कमी वाटत आहे. त्यामुळे त्यांनी झोन क्रमांक चारकडे असलेल्या कामाचीही मागणी केली आहे. रविभनगरच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्‍यवधीच्या निविदा निघाल्या आहेत. त्याकरिताच हा खटाटोप सुरू असल्याची खमंग चर्चा सा.बां. विभागात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com