Chandrapur News : खासदार प्रतिभा धानोरकर करणार आंदोलन; काय आहे कारण?

Chandrapur
ChandrapurTendernama
Published on

Chandrapur News चंद्रपूर : मागील सात वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम तीन महिन्यांत पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी दिला आहे. अधिकाऱ्यांसोबत त्यांनी उड्डाण पुलाची पाहणी करून बांधकामाची स्थिती जाणून घेतली.

Chandrapur
Sambhajinagar : संभाजीनगरकरांसाठी गुड न्यूज! अखेर 'त्या' रस्त्याला मिळाला ठेकेदार‌; 140 कोटीतून रस्ता होणार सुसाट

रेल्वे जाणाऱ्या मार्गावरील बाबूपेठ उड्डाणपुलाअभावी वाहनधारक व नागरिकांना ताटकळत राहावे लागते. 2017 मध्ये रडत-खडत काम सुरू झाले. उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाकडून 61 कोटी 57 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पण, सात वर्षांनंतरही हा पूल पूर्ण झाला नाही. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उड्डाण पुलाची पाहणी केली.

रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाचे काम रेल्वे विभाग तर रेल्वे हद्दीबाहेरील पोचमार्गाच बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. बांधकाम विभागाने बाबूपेठकडील चारही गाळ्यांचे गर्डर लॉचिंग व स्लॅबचे काम पूर्ण केले. बागला चौकाकडील सातपैकी पाच गाळ्यांचे पोचमार्गासह काम झाले. ओपन वेब गर्डर लॉचिंगसाठी स्पेस आवश्यक असल्याने रेल्वेने दोन गाळ्यांचे काम थांबविले. 

Chandrapur
Impact : जालन्यातील कंडारी ते टेंभी रस्त्याच्या चौकशीसाठी नेमला चौकशी अधिकारी

उजव्या बाजूच्या सर्विस रोडवरील अतिक्रमण न्यायप्रविष्ट आहे. चंद्रपूर मनपाने आपल्या वाट्याचे 5 कोटी दिले. राज्याने स्वतःच्या वाट्यातील 40 कोटी 26 लाखांपैकी किती दिले हे गुलदस्त्यात आहे. मागील सात वर्षापासून पुलाचे काम हे संथगतिने सुरु आहे. काम कासव गतीने होत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नेहमीच ट्रैफिक समस्येचा सामना करावा लागतो. लोकांची समस्या लक्षात घेता, खासदार बनताच प्रतिभा धनोरकर या एक्शन मोड वर आल्या आहे. काम तीन महिन्यात पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याची चेतावनी त्यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com