Chandrapur News : मुदत संपली तरी काम संपेना! गोसेखुर्दच्या कालव्याची कासवगती कायम

Gosikhurd
GosikhurdTendernama
Published on

Chandrapur News चंद्रपूर : नागभीड गोसेखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam) घोडाझरी शाखा कालव्याचे काम आताही कासवगतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याची नियोजित मुदत जून 2024 पर्यंत होती. पण आताही बरेच काम बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Gosikhurd
महायुतीला फटका बसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली; शेतकऱ्यांचा विरोध

या कालव्याचे बऱ्यापैकी काम झाले आहे. असे असले तरी दोन ठिकाणी रेल्वे आणि वनविभागाच्या अडचणी आहेत. रेल्वेपैकी नागभीड तालुक्यातील खैरीचक पारखी या ठिकाणचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र याच तालुक्यातील मेंढा किरमिटी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळील कामास अद्यापही सुरुवातच करण्यात आली नाही. परिणामी हे काम आणखी दोन वर्षे लांबेल, असे बोलल्या जात आहे.

वनविभागाच्या अडचणी वेगळ्याच आहेत. गोसेखुर्दच्या घोडाझरी शाखा कालव्याचे काम जून 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Gosikhurd
Pune News : मेट्रोने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी काय आहे Good News?

या कारणामुळे होत आहे विलंब... 

गोसेखुर्द प्रकल्पातंर्गत उपलब्ध निधीचे वितरणात प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास त्यांच्या भूसंपादनास प्राधान्य असणे, कालव्यासाठी लागणाऱ्या 403 हेक्टर खासगी जमिनीचे संपादन, कोरोना महामारीमुळे कालव्याचे सर्व कामे बंद असणे, रेल्वे क्रॉसिंगच्या तीन कामास रेल्वे विभागाकडून विलंबाने परवानगी मिळणे आणि वडनेरे समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने प्रगतिपथावरील 17 टेंडर रद्द करून फेरटेंडर काढणे या करणामुळे विलंब होत असल्याचे समोर आले आहे.

सोबतच रेल्वे आणि वनविभागाचा खोडा आड आला आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर दिले नाही.

Gosikhurd
स्मार्ट प्रीपेड मीटर्स रद्द केल्याचे गाजर नको; अधिकृतपणे जाहीर करा तरच...

घोडाझरी शाखा कालव्यास 23 जून 2006 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. नागभीड तालुक्यात हा कालवा 55.55 किमी लांबीचा आहे. या घोडाझरी शाखा कालव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना सिंचन होणार आहे. यात नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल व सावली वा तालुक्यांचा समावेश आहे.

या तालुक्यांमधील एकूण 119 गावांमधील 29,061 हेक्टर जमीन सिंचित करण्याचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत एक दोन तालुक्यांचा अपवाद वगळता अद्याप बाकी तालुके सिंचनापासून दूरच आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com