Nagpur News नागपूर : अर्थसंकल्पात रामटेक तालुक्याला भरगोस निधीची घोषणा करण्यात आली आहे.
रामटेक विकास आराखड्याला चालना देण्यासह आध्यात्मिक गुरू व समाजसुधारक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या स्मारकासाठी मौदा तालुक्यातील पावडदौना येथे 77 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोन्ही प्रकल्पांसाठी विशेष पुढाकार घेतला होता.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात 211 कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामांना आता गती येणार आहे. रामटेक प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शान पुनीत झालेले पवित्र स्थान आहे. पण या तीर्थक्षेत्र विकासाची गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा आहे. त्यामुळे रामटेक परिसराचा मानव विकास निर्देशांक कमी झाला. राज्य सरकारने 2018 मध्ये रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला. यापूर्वीही माजी आमदार आनंदराव देशमुख यांच्या काळातही 150 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला. मात्र निधीअभावी मात्र विकास झाला नाही.
माजी आमदार डीएम रेड्डी यांच्या काळात परत रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला, त्यांनी पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यातील 49.28 कोटींची कामांना प्रशासकीय मान्यता घेतली. या कामात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 30.35 कोटी रुपयांची 23 कामे मंजूर करण्यात आली. टेंडर प्रक्रिया पूर्ण करून 16 कामांना सुरवात केली. यात 7 कामांना वनविभाग व पुरातत्त्व खात्याने नाहरकत दिली नाही त्यामुळे 8.63 कोटींची कामे रद्द करण्यात आली. यात अंबाळा तलावाजवळ राम उद्यानाचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात गडमंदिर व अंबाळा येथील यात्री सुविधा केंद्र, सुलभ शौचालय, ध्यान केंद्र, अंबाळा येथे स्मशान घर, श्रीराम उद्यान, भव्य प्रवेशद्वार, रेलिंग गार्ड, पार्किंग व्यवस्था, ओम गार्डन रखरखाव, अंबाळा तलाव कुंपण याचे काम केले जाणार आहे.
गढ़मंदिर दोन पदरी रोड व नाली बांधकाम, अंबाळा रोड, त्रिविक्रम मंदिर ते खिंडसी वायर लूप रेलिंग, आणि सोलर पॅनल, गढ़मंदिर ते बर्ची शाळा संरक्षक भिंत, गणपती मंदिर, कुमारिका बावली विकास, राम उद्यान, रामाळेश्वर तलाव विकास, प्रकाश व आवाज शो, कालिदास स्मारक विकास, पाणी पुरवठा, राखी तलाव विकास, सीसीटीव्ही कॅमेरे, नगरधन किल्ला विकास, विविध मंदिरांचा विकास, गढ़मटिरावर जाण्यासाठी रोप वे, एक्सेलेटर स्मारक सुविधा, अशा अनेक कामांना गती मिळणार आहे.