नागपूर (Nagpur) : हल्दीराम हा 87 वर्ष जूना देशी ब्रँड देश-विदेशात घराघरात प्रसिद्ध आहे. हल्दीरामचे नमकीन भुजिया, स्नैक्स आणि अन्य फूड ला खूप पसंती आहे. आता हल्दीराम (HSFPL) नवीन रुपात समोर येणार आहे. कारण हल्दीराम स्नॅक्स फूड कंपनी 70 हजार कोटीत विकली गेली आहे. ब्लॅकस्टोनने 74% कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला.
अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) आणि सिंगापूरच्या GIC यांच्या सहकार्याने ब्लॅकस्टोन हल्दीराम स्नॅक्स फूड (HSFPL) च्या शेअर्सचा मोठा भाग खरेदी करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जगातील सर्वात मोठा खाजगी इक्विटी फंड असलेल्या ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखालील समूहाने भारतातील सर्वात मोठ्या स्नॅक आणि कन्व्हिनियन्स फूड कंपनीमध्ये बहुसंख्य भाग भांडवल मिळविण्यासाठी नॉन-बाइंडिंग ऑफर सादर केली होती. जगातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनच्या नेतृत्वाखालील गुंतवणूकदार गटाकडून हल्दीराम स्नॅक्स फूड (HSFPL) मधील बहुसंख्य स्टेक खरेदी करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्लॅकस्टोनसोबतच अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि सिंगापूर सरकारची जीआयसीही या डीलमध्ये सामील आहे. हा करार 8.1 अब्ज डॉलरचा असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतातील FMCG क्षेत्रातील हे सर्वात मोठे संपादन होईल. हल्दीराम हा भारतातील मोठा ब्रँड आहे. हल्दीराम नमकीन, चिप्स, मिठाई आणि शीतपेयांसह विविध प्रकारचे स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ तयार करते. कंपनीची स्थापना 1937 मध्ये झाली होती. ब्लॅकस्टोन आणि त्याच्या भागीदाराने हल्दीराममध्ये 74-76 टक्के हिस्सा खरेदी केला. त्याची अंदाजे किंमत 8 ते 8.5 अब्ज डॉलर्स (66,400-70,500 कोटी रुपये) आहे. हा करार पुढे गेल्यास, हे भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे खाजगी इक्विटी अधिग्रहण असेल. नागपूर स्थित हल्दीराम ग्रुपच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आणि दिल्ली गटांमधील सुरु असलेला व्यवहार सध्या सुरू असलेल्या यशस्वी विलीनीकरणावर अवलंबून आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) कडून मंजूर करण्यात आले आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारतीय स्पर्धा आयोग (CCI) गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विलीनीकरणाला मंजुरी दिली होती.
वाढू शकते शेयर्स :
ब्लॅकस्टोनने त्याच्या कॅनेडियन आणि इतर आशियाई लिमिटेड पार्टनर्स यांच्याशी देखील संपर्क साधला आहे. म्हणूनच शेअर्सची रक्कम वाढू शकते.
100 देशांमध्ये कंपनीचे कामकाज :
स्नॅक फूड बिजनेस जसे की, 500 प्रकारचे स्नॅक्स, नमकीन, मिठाई, रेडी टू इट आणि प्री मिक्स फूड, कुकीज, नॉन-कार्बोनेटेड रेडी-टू-ड्रिंक पेये आणि पास्ता यासारख्या 500 प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करतो. हा व्यवसाय सुमारे 100 देशांमध्ये चालतो. अनेक ऑपरेशन्स फ्रँचायझींद्वारे केल्या जातात. यामध्ये ब्रिटन, अमेरिका आणि जपानमधील ठिकाणांचा समावेश आहे. या करारातून 1,800 कोटी रुपयांचा रेस्टॉरंट व्यवसाय वगळण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात केके चुटानी यांची हल्दीरामचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीने पहिल्यांदाच एखाद्या व्यावसायिकाकडे कमान सोपवली होती. चुटानी हे यापूर्वी डाबर इंटरनॅशनलचे सीईओ होते. या गटाचे कोलकाता युनिट यापासून दूर असून ते स्वतंत्रही आहे. नागपूरसारख्या शहरातील हल्दीराम ग्रुपचा सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्यांच्याकडे कोणत्याही युनिट/शाखेत पार्किंग नाही. आता हँडओव्हर आणि टेकओव्हर प्रक्रिया कधी होईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच नवीन गट हल्दीरामच्या ब्रँडचा सध्याचा दर्जा टिकवून ठेवण्यास सक्षम असेल की नाही याची सर्वांना वाट आहे.