Nagpur : विस्तारीत समृद्धीसाठी 'या' दिग्गज कंपन्यांची कमर्शियल टेंडरमध्ये बाजी

Samruddhi Mahamargh
Samruddhi MahamarghTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली महामार्गासाठी कमर्शियल टेंडरमध्ये जीआर इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल 1इन्फ्रास्ट्रक्चर, अॅफकॉन इन्फ्रा, पटेल इन्फ्रा, एनसीसी, एचजी या कंपन्यांनी बाजी मारली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे.

Samruddhi Mahamargh
Mumbai : पावसाळी खड्ड्यांसाठी बीएमसीचे 250 कोटींचे बजेट; खड्डे शोधण्यासाठी अभियंत्यांचा दुचाकीवरून फेरफटका

महाराष्ट्रातील पूर्व विभाग भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हा भाग नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमा शीघ्र संचार मार्गाला जोडण्याच्यादृष्टीने समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नैसर्गिक खनिज साठ्यांनी समृद्ध मात्र अल्प विकसित भागांच्या विकासासाठी हा भाग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या विस्तारित मार्गांमुळे गौण खनिजांची मालवाहतूक रस्तेमार्गे जलद गतीने होण्यास मदत होईल. तसेच, पूर्व भागातील अविकसित आणि आदिवासी क्षेत्र मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊन त्या परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल. यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचा भाग असलेल्या भंडारा - गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी एका टप्प्यात, गोंदिया - नागपूर द्रुतगती महामार्गासाठी चार टप्प्यांत आणि नागपूर - चंद्रपूर द्रुतगती महामार्गासाठी सहा टप्प्यांत टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. या टेंडरना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तीन प्रकल्पांसाठी 11 टप्प्यांत 46 टेंडर भरण्यात आली होती. त्यापैकी जीआर इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर, अॅफकॉन इन्फ्रा, पटेल इन्फ्रा या कंपन्यांनी बाजी मारली आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना टेंडर वाटप केले जाणार आहे. या वर्षातच या प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्याचे 'एमएसआरडीसी'चे नियोजन आहे.

Samruddhi Mahamargh
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

कमर्शियल टेंडरमध्ये लोअर बिडर कंपन्या :

भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग

पटेल इन्फ्रा

गोंदिया-नागपूर द्रुतगती महामार्ग

1-अॅफकॉन इन्फ्रा

2-अॅफकॉन इन्फ्रा

3- एनसीसी

4-एनसीसी

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग

1-जीआर इन्फ्रा

2-गवार कन्स्ट्रक्शन

3-गवार कन्स्ट्रक्शन

4-एचजी इन्फ्रा

5-एचजी इन्फ्रा

6-बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com