स्मार्ट सिटी स्पर्धेत नागपूर शहराची का होतेय 'स्मार्ट' घसरण?

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनतर्फे आयोजित 'इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड कॉंटेस्ट'च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील ७५ शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यात नागपूर ३८व्या क्रमांकावर आहे. पुणे शहराने देशातून आठवे तर राज्यातून पहिले स्थान पटकाविले.

Nagpur
बुलेट ट्रेनचे मोठे टेंडर बांधकाम क्षेत्रातल्या 'या' बलाढ्य कंपनीला

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, भरतवाडा आणि पुनापूर या भागातील १७३० एकर जमिनीवर अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांना राज्य व केंद्र सरकारतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहरात अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत टेंडर श्युअर प्रकल्प आणि होम स्वीट होम प्रकल्पाचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षी नागपूरने देशातून पहिला क्रमांक पटकाविला. मात्र, गेल्या काही वर्षापासून स्मार्ट सिटीची सतत घसरण होत आहे.

Nagpur
अबब! मुंबईत कोणी खरेदी केला तब्बल 98 कोटींचा फ्लॅट? जाणून घ्या...

स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांनी अलिकडेच नागपूर स्मार्ट सिटीला भेट देऊन कामाची पाहणी केली. मात्र, नागपूर शहराने केंद्र सरकारकडून या मिशनअंतर्गत मिळालेल्या निधीचा शंभर टक्के विनियोग झालेला नसून, प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नसल्याचे दिसून आले. स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी सीईओच्या नावे ४ मे २०२२ रोजी पत्र पाठवले आहे. त्या पत्रानुसार देशातील ७५ स्मार्ट सिटींची क्रमवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’मध्ये पात्र ठरलेली ही शहरे आहेत. या शहरांना दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी ३० जून २०२२ पर्यंत नामांकन दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. हे नामनिर्देशन सादर करताना दहा विविध उपक्रमांसाठी मिळालेल्या बक्षिसांचा तपशील ‘प्रोजेक्ट अवॉर्ड’साठी द्यावा लागणार आहे.

Nagpur
१२ कोटी बुडवणाऱ्या नागपुरातील 'त्या' डॉक्टरच्या संपत्तीवर टाच

‘इनोव्हेशन अवॉर्ड’साठी दोन संकल्पनांचे सादरीकरण करावे लागणार आहे. त्याशिवाय सिटी अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड, लीडरशीप अवॉर्ड आणि पार्टनर्स अवॉर्डसाठी चार संकल्पना द्याव्या लागणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’मध्ये पात्र ठरलेल्या ७५ शहरांपैकी पहिल्या १५ शहरांमध्ये महाराष्ट्रातून पुणे आणि औरंगाबाद या शहरांचा क्रमांक लागला आहे. पुणे हे शहर ८व्या स्थानी तर औरंगाबाद १४व्या स्थानी आले आहे. नागपूरने ३८वे स्थान गाठले आहे. पहिल्या १५ शहरांत नागपूरला स्थान मिळालेले नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com