Amravati : मोर्शी-चांदूर बाजार महामार्गाबाबत चांगली बातमी; 'हा' अडथळा लवकरच दूर होणार

Morshi - Chandurbajar
Morshi - ChandurbajarTendernama
Published on

अमरावती (Amravati) : चांदूर बाजार-मोर्शी मार्गावरील खानापूर गावात दीडशे मीटर टप्प्यात असलेल्या अडथळ्यामुळे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत. गावातील अंशत: ताब्यात घेतलेल्या 26 घरांसाठी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Morshi - Chandurbajar
Konkan Expressway च्या कामाला मिळणार गती; ताशी 100 किमीने मुंबई ते सिंधुदुर्ग सुसाट

खानापूर गावातून गेलेल्या रस्त्याची दुरवस्था असून, येथून दुचाकी-चारचाकी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी कित्येक अपघात घडले. गावातील नागरिकांच्या वतीने रस्त्यावर जमा झालेल्या गाळात लोटांगण तथा चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

Morshi - Chandurbajar
Nashik : सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन दर वाढवण्याबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?

अखेरीस दोन वर्षांपासून प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 चे काम आता लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने खानापूर ग्रामवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या 26 घरांची अंशतः जागा स्वीकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी 56 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या दीडशे मीटर प्रलंबित बांधकामापैकी 60 मीटरवर राममंदिराचे बांधकाम आहे. या प्रलंबित बांधकामामुळे परतवाडा-नागपूर मार्गे अंबाडा एसटी बसफेरी खानापूर ऐवजी चिंचोली गवळी मार्गे वळविण्यात आली आहे. 

Morshi - Chandurbajar
Nashik : मराठवाड्यासाठीच्या 14 हजार कोटींच्या 'या' योजनांचा नाशिकलाही होणार फायदा

मोबदला मंजूर झालेले काही घरमालक दगावले असल्याने त्यांच्याबाबत कायदेशीर वारसपत्र तहसीलदार यांच्याकडून मंजूर झाल्याशिवाय मोबदला वाटप होऊ शकत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रलंबित बांधकाम प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सहकार्य करावे, असे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com