अकोला (Akola) : अकोला तालुक्यातील गणेशपुर (पात्रंबा) येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे वाढल्यामुळे भिंतीला तडे गेले आहेत. तसेच धरणाखालील रस्ता नादुरुस्त असून, कालव्यांची सुद्धा दयनीय अवस्था झालेली आहे. परिणामी संपूर्ण प्रकल्पाची झालेली दुरवस्था गमेशपुर, पाचंबा येथील गावकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. सदर काम तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणी गणेशपुर ग्राम पंचायतने मृद व जलसंधारण विभागाकडे केली आहे.
येथील लघु सिंचन प्रकल्प कार्यान्वित होऊन जवळपास पंचवीस ते तीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र संबंधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे, झुडपे वाढली आहेत. परिणामी प्रकल्पाच्या भिंतीला तडे गेले असून दुरावस्था झालेला प्रकल्प संबंधीत गावकऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे. शिवाय सदर प्रकल्पातून शेतीच्या सिंचनासाठी काढण्यात आलेल्या कालव्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांची डोकेदुखी वाढली असून, कालव्याची गत असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
येथील लघुसिंचन प्रकल्पाला तीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या स्तुत्य हेतूची वाट लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पातून काढण्यात आलेल्या सिंचन कालव्यांकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कालव्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मुख्य कालवा फुटला असून अनेक ठिकाणचे बांधकाम पालथे पडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कालव्यापासून फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे. मुख्य कालव्यापासून निघालेल्या उपकालव्याची गत तर त्याहीपेक्षा बिकट झाली आहे.
सदर कालव्यात काटेरी झाडं, झुडपं व गवत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कालवा ओळखायला येणे दुरापास्त झाले आहे. शिवाय पाचंबा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोगी पडणारा नाला गाळला गेला असल्यामूळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. तसेब प्रकल्पाच्या देखरेखीसाठी व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता उखडून गेला आहे. परिणामी संबंधीत शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. या बाबत गणेशपुर पाचंबा गट ग्राम पंचायतीच्या वतीने सर्वानुमते ठराय घेऊन मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
प्रकल्पातील गाळाचा उपसा होणे गरजेचे :
पावसाळ्याच्या दिवसात अडवलेला मुख्य नाला व इतर लहान मोठ्या नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे सदर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्प तुडूंब भरुन अतिरिक्त पाणी सांडव्याहारे चाहुन जाते. परिणामी प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा होत नाही. याचा परिणाम घेट रब्बी हंगामातील सिंबनावर होतो. कारण जलसाठा कमी असल्यामूळे प्रकल्प अल्पावधीतच खाली होतो. त्यासाठी गाळाचा उपसा होणे गरजेचे आहे. पाकडे संबंधीत प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
गणेशपूर येथील लघु सिंचन प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेले धरण बांधून बरीच वर्षे झाली आहेत. संबंधीतांच्या दुर्लक्षामुळे भिंतीला तडे गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सदर चरण धोकादायक झाले असून याचंबा व गणेशपुर येथील ग्रामस्थांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर बाबीचा संबंधीत विभाने गांभीयनि विचार करून तातडीने काम हाती घ्यावे हिच अपेक्षा आहे. अशी मागणी शोभा विजय जाधव, सरपंच, गणेशपुर / पाचंबा गट. ग्रा. पं यांनी केली.