Akola Municipal corporation

Akola Municipal corporation

Tendernama

अकोला महापालिका उत्पन्नातील ‘लिकेज' शोधणार

Published on

अकोला (Akola) : महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसोबतच होणाऱ्या खर्चातील ‘लिकेज’ शोधून भ्रष्टाचाराला आळा घातल्यास बराचशा निधी शिल्लक राहून तो विकासावर खर्च करता येईल, या विरोधी पक्ष सदस्यांच्या सूचनेसह उत्पन्न वाढीच्या इतर सूचनांवर चर्चा करीत शुक्रवारी मनपाच्या विशेष सभेत १२४६ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

Akola Municipal corporation

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकचे काम वेगाने; 'इतका' खर्च

स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी महापौर अर्चना जयंत मसने यांच्याकडे सोपविले. ऑनलाईन सभेला आयुक्त कविता द्विवेदी, उपमहापौर राजेंद्र गिरी व नगरसचिव अमोल डोईफोडे आदींची उपस्थित होती. त्यानंतर झालेल्या चर्चेत विरोध पक्ष सदस्यांनी मनपाच्या उत्पन्न वाढीत मोठा अडसर भ्रष्टाचार असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याला सत्ताधारी भाजपच्या स्वीकृत सदस्यांनी होकार भरला. निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेल्या अंदाजपत्राक कोणत्याही नाविण्य पूर्ण योजनेचा समावेश करण्यात आला नसला तरी कर वाढी रुपी कोणताही भार सर्व सामान्यांवर टाकण्यात आला नसल्याचे अंदाजपत्रकातून दिसून आले. एकूण १२४८ कोटी रुपयांचे शिलकीच्या अंदाजपत्रकाला अवघ्या ४५ मिनिटांच्या चर्चेनंतर सर्व पक्षांनी मंजुरी दिली.

Akola Municipal corporation

रत्नागिरी ते नागपूर चौपदरीकरणाच्या कामासाठी १८ कंपन्या उत्सुक

मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी सदस्यांनी सुचविलेले उपाय लक्षात घेवून अंदाजपत्रक मंजूर केले आहे. अंदाजपत्रकात शहराच्या विकासाचा सर्वांगिण विकास करण्यासोबतच सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडणार नाही, याचाही विचार केला आहे.
- महापौर अर्चना मसने

Akola Municipal corporation

मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन; अहवाल अंतिम टप्प्यात

मनपा निधीतून कोणताही विकास होत नाही. आर्थिक तरतूद केल्यानंतरही त्यासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचे आतापर्यंतचे चित्र होते. यावेळी आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केले आहे. सर्वकाही नियोजनाप्रमाणे झाल्यास आतापर्यंत होत असलेल्या तक्रारी पुढील वर्षी करण्यासाठी जागा राहणार नाही.
- आयुक्त कविता द्विवेदी

Akola Municipal corporation

स्टेशनरी घोटाळ्यामुळे नागपूर महापालिकेत फेरफार

पुतळ्यांचा खर्च नको!
महानगरपालिका परिसरात महामानवांचे पुतळे बसवून परिसर पुतळामय करू नये. महामानवांचा योग्य तो सन्मान राखण्यासाठी मनपा सर्वच प्रकार प्रयत्न करीत असते. आज एक पुतळा बसविला तर उद्या प्रत्येक जण पुतळा बसविण्याची मागणी करेल. त्यामुळे पुतळ्यांवरील खर्च नको, अशी सूचना भाजपचे सिद्धार्थ शर्मा यांनी मांडली. त्यापूर्वी भाजपचेच सतीश ढगे यांनी प्रवेश द्वारावर शिवाजी महाराजांचा पुतळा तर परिसरात अलिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसविण्याची सूचना माजी महापौर सुमनताई गावंडे यांनी केली होती.

Tendernama
www.tendernama.com