'या' शहरात उभी राहतेय ४० कोटींची वातानुकूलित भाजी मंडई

Vegetable Market
Vegetable MarketTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : फुटपाथ आणि ओट्‍यांवरचा भाजी बाजार (Vegetable Market) आपण सर्वच बघतो आहे. मात्र भाजी बाजारामुळे रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) आणि अपघात लक्षात घेऊन नागपूर शरहातील पारडी-भांडेवाडी भागात चक्क ४० कोटी रुपये खर्च करून वातानुकूलित (Air conditioned) भाजी बाजार उभारण्यात येणार आहे.

Vegetable Market
'या' जिल्ह्यासाठी 'गुड न्यूज'; विकासाची गाडी आता सुस्साट...

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत पारडी-भांडेवाडी येथे अत्याधुनिक बाजारपेठ उभारण्याचे जाहीर केले आहे. मात्र याकरिता ज्या जागेची निवड करण्यात आली होती तेथे अनेक भूखंड आरक्षित होते. त्यामुळे सातत्याने अडचणी येत होत्या. मात्र राज्याच्या नगर विकास विभागाने येथील सर्व आरक्षण वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेशही जारी केला आहेत. त्यामुळे अत्याधुनिक भाजी बाजाराच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

Vegetable Market
नवी मुंबई महापालिकेत टक्केवारीचा बोलबाला; माननियांना हाव सुटेना!

पूर्व नागपूरच्या सीमेवर असलेल्या पारडी-भांडेवाडी परिसरात अनेक वर्षांपासून भाजी बाजार भरतो. शेजारच्या गावांमधील शेतकरी व विक्रेते येथे भाजी आणून विकतात. ताजी भाजी मिळत असल्याने अल्पवाधीच हा बाजार लोकप्रिय झाला. त्यामुळे भाजी विक्रेत्यांची संख्या वाढत गेली. आपली भाजी लवकरात लवकर विकली जावी म्हणून भाजी विक्रेते मोकळ्या मैदानातून रस्त्यावर आले. चक्क उड्डाणपुलावरच त्यांनी दुकाने थाटली होती. ज्या उड्डाणपुलावर दुकाने थाटली त्याचा समावेश राष्ट्रीय मार्गामध्ये येतो. भंडारा आणि मध्य प्रदेशात जाण्यासाठी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहतूक होत असते. बाजारामुळे येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत होती. या रस्त्यावर अनेक अपघातही झाले. त्यात अनेकांचे प्राण गेले.

Vegetable Market
कंत्राट संपताच 'क्लीनअप मार्शल'ला पालिकेने का दिला डच्चू?

गावकऱ्यांनी आंदोलने केली. वाहतूक रोखून धरली. भाजी विक्रेते आणि गावकरी असा संघर्ष निर्माण होऊ लागला होता. शेवटी नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केली. सर्व भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरून बाजूला केले. पुलाच्या शेजारची मोकळी जागा त्यांना व्यवसायासाठी उपलब्ध करून दिली. येथे अत्याधुनिक भाजी बाजार उभारण्याचे आश्वासन सर्वांना दिले होते. या अत्याधुनिक मार्केटचा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत समावेश केला. मात्र जागेवरील विविध आरक्षणामुळे बांधकामास अडचणी येत होत्या. यात सुमारे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला.

Vegetable Market
रखडलेल्या पेंधर उड्डाणपूल कामाला गती; ७० कोटींचे बजेट

गडकरी यांनी केलेली बाजाराची घोषणा भाजी विक्रेते विसरून गेले होते. मात्र सरकारी पातळीवर गडकरी यांचा पाठपुरावा सुरू होता. आता येथील सर्व आरक्षणे वगळण्यात आल्याचे पत्रच संबंधित यंत्रणेला राज्याच्या नगर विकास विभागाने पाठविले आहे. त्यामुळे अत्याधुनिक मार्केटच्या बांधकामाचाही प्रश्न सुटला आहे. हे मार्केट चार मजली राहणार आहेत. भाजी सोबतच मटन, फिश मार्केटसाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. बाजाराकडे जाणारे रस्ते प्रशस्त केले जाणार असून, पार्किंगचीही पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com