शिक्षणाचा 2 कोटींचा समग्र निधी परत; मुख्याध्यापकांना खर्चाचे...

Nagpur
NagpurTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : समग्र शिक्षणाचा दोन कोटींवरचा निधी सरकारकडे परत गेला. मुख्याध्यापकांच्या चुकीचा फटका बसला. त्यामुळे मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Nagpur
कमतरता नसताना पाणी टंचाई का?; गडकरींनी खडसावले 'या' कंपनीला

समग्र शिक्षणाअंतर्गत शिक्षण विभागाला कोट्यवधींचा निधी मिळतो. परंतु हा निधी खर्च करण्यात शिक्षण सपशेल अपयशी ठरला. झेडपीएफएमएस प्रणाली मुख्याध्यापकांना योग्यरीत्या हाताळता आली नाही. त्यामुळे त्यांना निधी वेळेत खर्च करता आला नाही. परंतु शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र बँकेच्या प्रणालीवर खापर फोडत हा निधी परत गेल्याचे सांगण्यात येते. मनुष्यबळाचा अभाव, ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित नसल्याने मुख्याध्यापक व बँक प्रशासनात व्यवहारादरम्यान अनेक अडथळे आले. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत हा निधी खर्च होऊ शकला नाही.

Nagpur
या सांडपाण्याचे करायचे काय?; नागपूर सुधार प्रन्यासने सोडवला प्रश्न

३१ मार्चच्या मध्यरात्रीला हा निधी सरकारने परत घेतला. सद्य:स्थित बँक खाते पूर्णत: रिकामे झाले आहे. पैसा असतानाही तो खर्च करता आला नाही. हा निधी परत येण्याची शक्यता नाही. शिक्षण विभागाने ३१ मार्चच्या दोन दिवसापूर्वी हा निधी खर्च करण्याचे सांगितले. शिक्षण विभाग हातावर हात धरून बसला होता. तर मुख्याध्यापकांनाही निधी खर्च आला नाही. काही मुख्याध्यापकांनी झेडपीएफएमएस प्रणाली हाताळायचे कुठलेही प्रशिक्षण दिले नव्हते. सर्व्हर डाउनची वारंवार समस्या येत होती, असे वेगवेगळी कारणे मुख्याध्यापक व शिक्षण विभागाकडून कारणे सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात वेगळीच गणिते असल्याची चर्चा आहे. निधी परत गेल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर अप्रत्यरीत्या अकार्यक्षमतेचा ठपका सरकार दरबारी लागणार आहे. त्यामुळे निधी परत गेल्या अप्रत्यक्ष फटका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही बसणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्रृटींची वेळीच माहिती दिली नाही. त्यामुळे यातील संबंधित जबाबदार मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com