Tribal Development : अखेर डीबीटीला खो! आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 43 कोटींच्या खरेदीला मंजुरी

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

नाशिक (Nashik) : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्टेशनरी, मौजे व बूट खरेदीसाठीच्या ४३ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

यामुळे या खरेदीसाठी लवकरच टेंडर (Tender) प्रक्रिया राबवली जाणार असून उर्वरित गणवेश व इतर साहित्य खरेदीसाठीच्या प्रस्तावांना अद्याप प्रशासकीय मंजुरीची अपेक्षा आहे. आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विदयार्थ्यांसाठी जवळपास १५० कोटी रुपयांची साहित्य खरेदी करणार असून उर्वरित रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

Devendra Fadnavis
Nashik : जलजीवन मिशनच्या देयकांच्या फायलींबाबत सरकारचा मोठा निर्णय; 'या' विभागाला वगळले

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९९ शासकीय आश्रमशाळांमधून जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासह विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ४९९ वसतीगृहांमध्ये निवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य, नाईट ड्रेस पुरवली जाते.

हे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्षाला ७५०० रुपये, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ८५०० रुपये  व नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ९५०० रुपये दरवर्षी दिले जातात. पूर्वी हे साहित्य पुरवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबवली जायची. यामुळे राज्याचा आदिवासी विभाग आदिवासींच्या विकासाऐवजी विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचारामुळेच जास्त गाजत असे. तसेच गणवेश, नाइट ड्रेस, शालेय साहित्य, बूट, सतरंज्या, कपाट या वस्तू निकृष्ट दर्जाच्या पुरवल्या जात असत.

Devendra Fadnavis
Nashik : मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोलनाक्यावर सवलतीसाठी 31 ऑक्टोबरला बैठक

याबाबत तक्रारी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१६ मध्ये खरेदीचे ठेके रद्द करीत थेट आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे धोरण स्वीकारले होते. या धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या पसंतीने वस्तू खरेदी करू शकत. मात्र, या विद्यार्थ्यांना थेट रक्कम दिल्यामुळे त्या पैशातून ते ठरवून दिलेल्या वस्तू खरेदी करीत नाहीत. ती रक्कम पालकांकडून इतर कामांसाठी वापरली जाते. यामुळे विद्यार्थी या सुविधांपासून वंचित राहतात, अशी कारणे देऊन आदिवासी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने डीबीटी योजना रद्द करण्याची मागणी पुढे करण्यात आली. त्यासाठी समितीही नियुक्त केली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर शिंदे-फडणवीस -पवार सरकारने ३१ जुलैस शासन निर्णय निर्गमित 'डीबीटी' योजनेतून गणवेश संच, नाइट ड्रेस, शालेय साहित्य व लेखनसामग्री वगळण्यात आली आहे. यासाठी सरकारने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एकसमान असावा, गणवेश संचामध्ये शर्ट, पँट, बूट, पीटीड्रेस, सॉक्स आदींमध्ये एकसमानता राहावी यासाठी या वस्तू 'डीबीटी'तून वगळण्यात आल्याचे कारण दिले आहे.

Devendra Fadnavis
Solapur : सोलापुरातील 'त्या' 855 गावांतील प्रत्येक कुटुंबाला भरावी लागणार 1200 रुपयांची पाणीपट्टी; 'हे' आहे कारण?

सरकारने या साहित्य खरेदीसाठी प्रत्येक वर्गनिहाय खर्च निश्चित केला असून यावर्षी ठरवल्यानुसार विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे प्रत्येकी चार हजार रुपये दिले जाणार असून उर्वरित रक्कम साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार आहे. राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य पुरवण्यासाठी एकाच वेळी २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी मिळून १५० कोटींची खरेदी केली जाणार आहे.

आदिवासी विकास विभागाने या वस्तू खरेदीसाठीचे प्रस्ताव मंत्रालयस्तरावर पाठवले असून त्यापैकी स्टेशनरी खरेदीच्या ३७ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना मौजे व बूट खरेदीच्या सहा कोटींच्या प्रस्तावालाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या दोन्ही बाबींना तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर आठवडाभरात टेंडर प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com