Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'वरील 625 किमीचा मार्ग आजपासून सुसाट; कारण...

Samruddhi Expressway
Samruddhi ExpresswayTendernama
Published on

नाशिक (Nashik) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर या ८० किलोमीटरच्या टप्प्यानंतर आता भरवीर ते नांदगाव सदो हा तिसरा २५ किलोमीटरचा टप्पा आजपासून (ता. ४) वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Samruddhi Expressway
Nashik : नाशिककरांसाठी Good News! 2018 नंतरची घरपट्टीतील वाढ रद्द होणार; काय म्हणाले मुख्यमंत्री?

सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नांदगाव सदो येथे या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. मागील वर्षी मेमध्ये शिर्डी ते भरवीर या ८०किलोमीटरचे लोकार्पण झाले होते. आता त्या पुढील २५ किलो मीटरचा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या वाहनांना मुंबई-आग्रा महामार्गावरून समृद्धीवर जाण्यासाठी अत्यंत सोईचे होणार आहे. या ठिकाणी या दोन्ही महामार्गांमध्ये केवळ २७५ मीटर अंतर आहे. नागपूर ते मुंबई या ७१० किलोमीटरच्या मार्गापैकी जवळपास ६२५ किलोमीटर मार्ग आता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते इगतपुरी हा ८० किलोमीटरचा मार्ग मागील मे मध्ये खुला झाल्याने ६०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास सध्या सुरू आहे. त्यापुढील म्हणजे समृद्धीच्या १३ व्या टप्प्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर ते नांदगाव सदो या दरम्यानच्या २५ किलोमीटरचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण झाले. या २५ किलोमीटरच्या भागात २५० मीटरचा बोगदा असून ४५० मीटरचा एक पूल आहे.

Samruddhi Expressway
MSRDC : पुणे-औरंगाबाद, पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडॉरचा प्रश्न सुटणार?

या २५ किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नांदगाव सदो येथे इंटरचेंज असणार आहे. या इंटरचेंजपासून मुंबई - आग्रा महामार्ग केवळ २५० मीटर अंतरावर आहे. यामुळे मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी अत्यंत सोईचे होणार आहे. या इंटरचेंजवर जाण्यासाठीचा २७५ मीटर रस्ता तयार झालेला आहे. या २५ किलोमीटरचा टप्पा खुला झाल्यानंतर मुंबईहून नागपूरच्या दिशेने तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना मुंबई-आग्रा महामार्ग व समृद्धी महामार्गावर जाणे सोईचे होणार आहे.

या आधीच्या भरपूर येथील इंटरचेंजवरवरून वाहने खाली उतरल्यानंतर त्यांना मुंबई - आग्रा महामार्गावर जाण्यास २० किलोमीटर एकेरी मार्गावरून जावे लागत असल्याने वाहनधारकांना गैरसोईचे होत होते. नांदगाव सदो येथील या नव्या इंटरचेंजमुळे वाहनधारकांची सोय होणार आहे. या २५ किलोमीटर मार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. नांदगाव सदो येथील इगतपुरी टोलनाक्याजवळ हा कार्यक्रम आज होत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com