Nashik : अमृत स्टेशन योजनेतून 'या' रेल्वे स्थानकांचा होणार विकास

Nagpur
NagpurTendernama
Published on

नाशिक (Nashik) : रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड, लासलगाव व देवळाली कॅम्प या रेल्वे स्थानकांचा विकास होणार असून त्यासाठी मध्यरेल्वे विभागाकडून प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या योजनेतून या स्थानकांचा कायापालट होणार आहे.

Nagpur
Vedanta Foxconn, Airbus : प्रकल्प बाहेर जाण्याबाबत सामंतांनी सादर केली श्वेतपत्रिकाच; खरं कोण?

रेल्वे मंत्रालयाने भारत स्टेशन योजनेतून देशातील १२०० रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भुसावळ मंडळातील मनमाड, बडनेरा, चाळीसगाव, शेगाव, नेपानगर, मलकापूर, मूर्तिजापर, देवळाली, नांदुरा, नांदगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ६) सकाळी ९ ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत. या कार्यक्रमास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, दर्शना ज़रदोष यांची उपस्थिती असणार आहेत.

Nagpur
Sand Auction : वाळू धोरणाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; मंत्री विखे पाटीलच म्हणाले...

रेल्वे मंत्रालयाच्या 'अमृत भारत स्थानक योजना' यात देशभरातील १२०० हून अधिक रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याने लवकरच त्यांचा कायापालट होणार आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्यावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक स्टेशन प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहचे काम सुरू आहे.

Nagpur
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी वाईट बातमी; 'त्या' 38 विहिरी...

विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह स्वच्छतागृह, नवीन फूटओवर बीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे. याशिवाय स्थानकांवर अमृत भारत योजना अंतर्गत कोणत्या सुविधा व विकास कामे आवश्यक आहेत. त्यासाठी १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com