नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी माहिती

Pune
Pune Tendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात खोडद (नारायणगाव) येथील दुर्बीणीचा अडसर असल्याने प्रस्तावित मार्ग बदलावा लागणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली.

Pune
Nashik : महापालिकेतील बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना पाठिशी घालण्याचे काम?

रेल्वेमंत्री वैष्णव नाशिक दौऱ्यावर आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खोडद येथील दुर्बीण ही २३ देशांची मिळून असल्याने तेथून मार्ग नेण्यात अडचणी आहेत. पुण्यात चार टर्मिनलचे काम सुरू असल्याने दीड वर्षानंतर पुण्यातील क्षमता दुप्पट होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच भागांतून पुण्यासाठी मार्गांची आणि गाड्यांची मागणी आहे. पण, तूर्तास तरी इतर भागांतून तेथे रेल्वे सोडण्यात अडचणी आहेत. त्यामुळे नाशिक- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पूर्ववत सुरू होण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शविली.

Pune
Mumbai : ब्लॅक लिस्टेड 'आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट'ला दीड हजार कोटींचे टेंडर; बीएमसीचा अनागोंदी कारभार

राज्यात १३२ स्थानके

महाराष्ट्राला २०१४ पर्यंत जेमतेम एक हजार २०० कोटी रुपयांचा निधी मिळायचा. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत १५ हजार ४९० कोटी निधी दिला. महाराष्ट्रात नागपूर, उजनी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, लासलगाव, नांदगाव, हडपसर, सावदा, पंढरपूर, हातकणंगले, सातारा, कोपरगाव यासह १३२ स्थानकांचे काम सुरू आहे. स्थानक विकास सहा हजार कोटी, उड्डाणपूल पाच हजार ५०० कोटी, बुलेट ट्रेन ३३ हजार कोटी, कोरिडॉर १२ हजार ५०० कोटी, जळगाव-जालना मार्ग सात हजार कोट, इंदूर- मनमाड- मुंबई मार्ग १८ हजार कोटी अशी एक लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात सरकार आल्यापासून झाली आहे. दहा वर्षांत श्रीलंकेच्या मार्गांपेक्षा अधिक एक हजार ८३० किलोमीटर रेल्वेमार्ग एकट्या महाराष्ट्रात झाले.

नमो रॅपिड ट्रेन

पहिल्या दोन कारकीर्दीत आम्ही अनेक प्रयोग केले. या पंचवार्षिकमध्ये त्याचे परिणाम दिसतील, असा दावा करीत ते म्हणाले, की देशात १०० ते २०० किलोमीटर अंतरासाठी नमो रॅपिड ट्रेनचा विचार आहे. पहिली ट्रेन दिल्ली-मेरठ अशी सुरू झाली. महाराष्ट्रातही अशा इंटर सिटी नमो रॅपिड ट्रेन दिसतील.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com