PWD मंत्र्यांची नाशिककरांना गुड न्यूज; 'या' मार्गाचे विस्तारीकरण

Ravindra Chavan.
Ravindra Chavan.Tendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी नाशिककरांना गुड न्यूज दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ वरील नाशिक ते मुंबई दरम्यान वडपे ते गोंदे भागाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच गोंदे ते पिंपरीसदो या २० किलोमीटर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण करण्यात येणार आहे, असे त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना पत्राद्वारे कळवले आहे. यामुळे नाशिक ते मुंबई मार्गावरील खड्ड्यापासून वाहन चालकांची सुटका होणार आहे.

Ravindra Chavan.
बीकेसीत बुलेट ट्रेनच्या कामांना गती; अंतर्गत बांधकामांसाठी टेंडर

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील नाशिक ते मुंबई या रस्त्याच्या दुरावस्थेवर उपाययोजना करण्यासाठी माजी मंत्री छगन शासनाचे लक्ष वेधले. तसेच या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याची मागणी केली.  त्यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कपात सूचना देखील मांडली होती. या कपात सूचनेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे लेखी माहिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग (NH-3) केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणांच्या अखत्यारीत आहे. या महामार्गावरील वडपे ते ठाणे या लांबीमध्ये पावसाळयात पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आवश्यक त्या भागात नूतनीकरण करण्यात येत असुन कशेळी व कळवा पुलाचे काम करण्यात येत आहे. 

Ravindra Chavan.
Mumbai : 2 हजार कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला नव्या जागेची प्रतीक्षा

वडपे ते ठाणे या भागात वाहतूक क्षमतेएवढी अस्तित्वातील रस्त्याची रुंदी नाही. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने वडपे ते ठाणे दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरणाने आठ पदरी रस्त्याचे बांधकामास सुरुवात केली आहे. प्रकल्पाअंतर्गत आठ पदरी रस्त्यासह २ पदरी सर्विस रोड. भुयारी मार्ग, लहान व मोठे पूल यांचा बांधकामात समावेश आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरीक्त घोटी-सिन्नर, पिंपरीसदो, कसारा वशाळा, आसनगाव, वाशिंद, खडवली आणि कल्याण बापगाव जंक्शनवर उड्डाणपूल अथवा बोगदयाची कामे सुरु असून रस्ता विस्तारीकरणामुळे स्थानिक आणि अवजड वाहतुकीचे विभाजन होईल असे म्हटले आहे.

Ravindra Chavan.
Nashik : जलजीवन कामांच्या चौकशीशिवाय बिले देऊ नका; कोणी केली मागणी

तसेच वडपे ते गोंदे या ९९.५० किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम बांधा, वापरा, हस्तांतरण या तत्वावर १२.०४.२००६ ते  ११.०४.२०२६ पर्यंत देण्यात आले आहे. या कामाचे पर्यवेक्षण स्वतंत्र अभियंता करत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरिल वडपे ते गोंदे भागाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर या महामार्गावरील काही वाहतुक समृध्दी महामार्गावर वळवण्याचे नियोजन असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर गोंदे ते पिंपरीसदो या २० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग (झिरो) मध्ये समावेश झाला असुन त्याला केंद्रीय मंत्रालयाची मान्यता मिळली आहे. या भागात व्हाइट टोपिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण, सेवा रस्ते, गजबजलेल्या चौकांसाठी उड्डाणपूल किंवा बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. अतिवृष्टी व जड वाहतुक, तसेच वाढते शहरीकरण, लॉजीस्टीक पार्क व रहदारीचे वाढते प्रमाण तसेच सेवा रस्ते व उड्डाणपूल यांच्या अभावामुळे स्थानिक वाहतुक व महामार्गीय वाहतुक एकत्र येत असल्यामुळे वाहतुक कोंडी होते. सदर समस्या दुर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com