नाशिक (Nashik) : नाशिक- पुणे रस्ता (Nashik Pune Highway) सध्या अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.
नाशिकचे रस्ते पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब झालेले आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावण्यासह अपघातांची संख्या वाढली आहे. लोकांच्या आरोग्यावर खड्ड्यांमुळे विपरीत परिणाम होत आहे. आगामी काळात नाशिकमधील विविध राजकीय पक्ष खड्ड्यांवरून आंदोलन करतील, अशी स्थिती आहे.
अडचणींचा सामना
- नाशिक शहरातून जाणारा नाशिक- पुणे रोड सिन्नर फाट्यापर्यंत खराब
- नाशिक महानगरपालिका हद्दीत येणारा अंदाजे १८ किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी व्यापलेला
- खड्ड्यामुळे वाहनांची गती मंदावलेली असून रोज लहान-मोठे अपघात घडत आहे
- दत्त मंदिर तेथे द्वारका हा सहा किलोमीटरचा रस्ता तीन महिन्यांपूर्वी १९ कोटी रुपये खर्चून तयार केला. सध्या या रस्त्यावर कच आणि वाळूचे आवरण
- पुणे रस्त्याने प्रवास करणे खडतर. खड्ड्यांमुळे त्वचेसह, डोळे, कंबर- मान- पाठदुखीचे विकार - मणक्याचे विकार होत होण्याच्या तक्रारी
- हे खड्डे म्हणजे अपघाताचे केंद्र बनलेले आहे
- नाशिक ही धार्मिक पर्यटन नगरी असल्यामुळे २४ तास या रस्त्यांवर वाहनांचा राबता असतो. खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने कोंडीत भर
- रस्त्यावर असणाऱ्या काही उपहारगृहे, हॉटेलमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते.