Nashik : मालेगाव महापालिकेच्या 75 कोटींच्या घंटागाडी टेंडरला वाढता विरोध

Malegaon Municipal Corporation
Malegaon Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : मालेगाव महापालिकेने कचरा संकलनाचे म्हणजे घंटागाडीचे ७५ कोटी रुपयांचे टेंडर रद्द करून किमान वेतनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कचरा संकलन करावा, रुग्णालयातील औषध खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी 'आम्ही मालेगावकर' विधायक संघर्ष समितीतर्फे महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामुळे मालेगाव महापालिकेच्या कचरा संकलन टेंडरला वाढता विरोध होऊ लागल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Malegaon Municipal Corporation
Nashik : आधीच अडचणीत असलेल्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला कोणी पाठवली जप्तीची नोटीस?

मालेगाव महापालिकेने आगामी पाच वर्षांसाठी शहरातील कचरा संकलनासाठी ७५ कोटींपेक्षा जास्त रकमेचे घंटागाडी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेला यापूर्वी माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यास विरोध केल्यानंतर हिंदू-मुस्लिम एकता संघटनेनेही टेंडर प्रक्रिया रद्द करून महापालिका प्रशासनाने यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची भरती करून घंटागाडी चालवावी, अशी मागणी केली आहे. मालेगाव महापालिकेने मागील दहा वर्षांच्या काळात वॉटरग्रेस कंपनीला कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला होता. या काळात वॉटरग्रेस कंपनीच्या कामकाजाविरोधात शेकडो तक्रारी आल्या. कचरा संकलनात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचेही आरोप झाले होते. दरम्यान मालेगाव महापालिकेने नव्याने पाच वर्षांसाठी कचरा संकलनाचे ७५ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.

Malegaon Municipal Corporation
Nashik : आधीच अडचणीत असलेल्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला कोणी पाठवली जप्तीची नोटीस?

या टेंडरला माजी आमदार आसिफ शेख यांनी विरोध केला असतानाच हिंदू मुस्तील एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध करीत महापालिकेने मानधन तत्त्वावर कर्मचारी भरून स्वतः कचरा संकलन व स्वच्छतेची कामे करावीत, अशी मागणी केली होती. त्यानंतर आम्ही मालेगावकर या संघटनेनेही या कचरा संकल्न टेंडरविरोधात भूमिका घेतली आहे. या टेंडरमुळे मालेगाव महापालिकेचे नुकसान होईल. गेल्या दहा वर्षातील वॉटरग्रेसचा अनुभव चांगला नाही. ठेका देऊनही शहरातील स्वच्छतेची समस्या दूर झाली नव्हती. महापालिकेने कायम सेवेतील ७०२ व मानधन तत्त्वावरील कर्मचारी नेमून कचरा संकलन करावा. मनपाची स्वच्छता विभागाची शेकडो वाहने कचरा डेपोवर धूळ खात पडली आहेत. मनपाने स्वतः जबाबदारी घेतल्यास आर्थिक बचत होईल. स्वच्छतेसंदर्भात सुरळीत कामे होतील, मनपाकडे कचरा संकलन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Malegaon Municipal Corporation
Mumbai : मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांसाठी 'हा' प्रकल्प ठरणार गेम चेंजर! टेंडरला मुदतवाढ

औषध खरेदीची चौकशी करावी
मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेले औषध खरेदीचे टेंडरही वादास सापडले असून तो वाद उच्चन्यायालयात गेला आहे. आरोग्य विभागाने अवाजवी दराने औषध खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे या ठेक्याची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. आंदोलनात आम्ही मालेगावकर' विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, रामदास बोरसे, देवा पाटील, प्रा. के. एन. अहिले,भरत पाटील, जितेंद्र देसले, कैलास शर्मा, क्रांती पाटील, सुशांत कुलकर्णी, प्रवीण चौधरी, कैलास तिसगे, सोहेल डालरीया, मोहन कांबळे, संदीप अभोणकर, करण भोसले, साहेबराव वाघ, रवीराज सोनार, प्रा. जगदीश खैरनार, राजेंद्र पाटील, आनिल पाटील, गोपाळ सोनवणे, संजय साबळे आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com