महावितरणच्या सोलर रुफटॉप योजनाला मोठा प्रतिसाद; 52 मेगावॅट वीज..

Solar Panel
Solar PanelTendernama
Published on

नाशिक (Nashik) : विजेच्या वाढत्या दरामुळे वीज ग्राहकांकडून सौर वीज निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे विशेषतः शहरी भागात महावितरण कंपनीच्या सोलर रुफ टॉप या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.  राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी रुफ टॉप योजनेतून आतापर्यंत ५२ मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. अधिकाधिक गृह निर्माण संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Solar Panel
CM Shinde: धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अन् नालेसफाईवर..

महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना नेट मिटरिंग नावाची योजना सुरू केली आहे. त्यात रूफ टॉप सोलरमुळे सोसायटीच्या छतावर निर्माण झालेली वीज सोसायटीतील लिफ्ट, पाण्याचे पंप तसेच इमारतीतील जिने व पार्किंग येथील सार्वजनिक दिवे इत्यादी कामांसाठी वापरली जाते. सोसायटीच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंगद्वारे ठेवली जाते. सौरवीज कमी पडल्यास ग्राहकांना महावितरणची वीज वापरण्याची सुविधा आहे.

Solar Panel
Mumbai : साडेतीन लाख विद्यार्थ्यांना 20 कोटींचे शालेय साहित्य मोफत

महावितरणला सोसायटीकडून मिळणाऱ्या विजेच्या बदल्यात सोसायटीच्या वीजबिलात कपात होते. महावितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका गृहनिर्माण सोसायटीने ९० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर त्यांचे दीड लाखाचे वीजबिल ७१ हजारांवर आले. तसेच आणखी एका हाऊसिंग सोसायटीने ८० वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यांचे विजेचे बिल १ लाख ४८ हजारांवरून ६६ हजारांवर आले.  हाऊसिंग सोसायट्यांना छतावरील सौर ऊर्जाप्रकल्प बसवण्यासाठी महावितरण मदत करते.

Solar Panel
Nashik : टोईंगचे नवे टेंडर सुरू असतानाच जुन्याला मुदतवाढ कोणासाठी?

महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart  या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. गृहनिर्माण संस्थांना ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी २० टक्के अनुदान मिळते. नोंदणी असलेल्या एजन्सीमार्फत प्रकल्प उभारले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्यावर कंपनीकडून मदत केली जाते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com