NIMA Startup Summit : स्टार्टअप समिटमध्ये नवउद्योगांत गुंतवणुकीसाठी 65 कोटींचे करार

Nashik Nima
Nashik NimaTendernama
Published on

नाशिक (Nashik) : निमातर्फे (NIMA) भरवण्यात आलेल्या स्टार्टअप समिटमध्ये (Startup Summit) नाशिकमधील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले आहेत.

यामुळे निमा स्टार्टअप समिटमध्ये जवळपास ६५ कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्यास मदत होणशर आहे.

Nashik Nima
Pune : तब्बल सव्वा सहा लाख पुणेकर पीएनजीच्या प्रेमात? काय आहे प्रकरण?

नाशिक येथील उद्योजकांच्या निमा या संस्थेने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढून चांगल्या कल्पनांचे प्रत्यक्ष उत्पादन व्हावे, यासाठी निमा समिट भरवण्यात आले होते. निमाने यासाठी प्रदर्शनीय दालन उपलब्ध करून दिले होते. यामुळे स्टार्टअप्ससाठी ही एकप्रकारे पर्वणीच ठरली.

या समिटमध्ये नाशिक व इतर शहरांतील २००० हून अधिक उद्योजक, महिला, व्यापारी, शासकीय अधिकारी यांनी दोन दिवसांमध्ये भेट दिली. या स्टार्टअप्सना वित्त साहाय्यासाठी मुंबई, पुणे, बंगळूर, नाशिक तसेच राज्याबाहेरीलही सुमारे ८० गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते.

त्यांच्यासमोर स्टार्टअप चालकांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण केले. या नावीन्यपूर्ण उत्पादनांना मोठ्याप्रमाणावर ग्राहकांपर्यंत न्यायचे असल्यास गुंतवणूकदारांनी प्रोत्साहन द्यावे आणि सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन यावेळी निमातर्फे करण्यात आले.

Nashik Nima
Mumbai : नालेसफाईतील निष्काळजीपणा भोवला; ठेकेदारांना 31 लाखांचा दंड

यावेळी ५० लाख रुपयांपासून २५ कोटीपर्यंतची मागणी स्टार्टअप्स चालकांनी उपस्थित गुंतवणूकदारांकडे केली व त्याला सर्वच गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिला. यामुळे ६५ कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

भारतातील सर्वात पहिली हायड्रोजनवर चालणारी रिक्षा उत्पादनाची संकल्पना नाशिक येथील नवउद्योजकाने मांडली असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सुद्धा त्या युवकाचा गौरव केला आहे. या हायड्रोजनवर चालवल्या जात असलेल्या रिक्षाचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. तो स्टार्टअप नाशिकमधीलच असल्याने सर्वांनाच अभिमान वाटला, स्टार्टअप समिटच्या माध्यमातून अनेक स्टार्टअप्सना आर्थिक मदत मिळवून देण्यात निमाचे योगदान मोलाचे राहिले, ही आमच्यादृष्टीने गौरवाची बाब असल्याचे निमाचे अध्यक्ष धनयंज बेळे यांनी सांगितले.

Nashik Nima
Mumbai : 'त्या' ऐतिहासिक कॉलनीच्या पुनर्विकासाला कोणामुळे लागला ब्रेक?

या समिटच्या माध्यमातून स्टार्टअप व महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक मजबूत होईल, असा विश्वास निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या स्टार्ट अप समिट समारोप प्रसंगी सर्व सहभागी स्टार्टअप व महिला उद्योजिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवले. स्टार्ट अप समिटला सहकार्य केलेल्या अशोक बिजनेस कॉलेज, नवजीवन कॉलेज, काकासाहेब वाघ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही या वेळी गौरवण्यात आले.

व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव विरल ठक्कर, स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील, सतीश कोठारी, नितीन आव्हाड, किरण खाबिया, किरण वाजे, सुधीर बडगुजर, प्रकाश गुंजाळ आदी होते. तत्पूर्वी इएसडीएसचे संस्थापक पियुष सोमाणी यांनी यशोगाथा उलगडून सांगताना उद्योजकांना उद्योग कसा करावा, याचा कानमंत्र दिला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com