Malegaon : भुयारी गटार टेंडरच्या अटी कोणासाठी केल्या शिथिल?

Drainage Line
Drainage LineTendernama
Published on

नाशिक (Nashik) : मालेगाव (Malegaon) शहरासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शहर मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार योजनेचे टेंडर राबवताना प्रकल्पाची किंमत व त्या तुलनेने टाकलेल्या किरकोळ अटिशर्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मार्जितल्या ठेकेदाराला टेंडरमध्ये  सहभाग घेता यावा म्हणून ४१९ कोटींच्या या कामासाठी केवळ २५ कोटींचे भागभांडवल असलेल्या ठेकेदार कंपनीला पात्र धरण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

Drainage Line
Mumbai : 'येथे' 400 कोटींच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन

मालेगाव शहरासाठी शहर मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे. या योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे.  या संस्थेने टेंडरसाठी तयार केलेल्या अटी, शर्ती आक्षेपार्ह असून महापालिका आयुक्त, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व महापालिकेच्या अभियंत्यांनी या योजनेचा ठेका हित संबंधातील व्यक्तीस मिळावा यासाठी संगनमत केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे.

Drainage Line
Mumbai-Ahmedabad Bullet Train : ठाणे डेपोसाठी 'या' कंपन्यात चुरस

मालेगाव शहरात भूमिगत गटार टाकण्याचे  ४१९ कोटींचे काम असताना टेंडरमध्ये टाकलेल्या क्षुल्लक व फुटकळ अटी शर्ती या कमकुवत ठेकेदाराला मिळाव्यात यासाठी असल्याचे असिफ शेख यांचे म्हणणे आहे. मालेगाव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अमृत-२ अंतर्गत भुयारी गटार योजनेची ४१९ कोटीचे ई-टेंडर प्रसिद्ध केले आहे. असिफ शेख यांनी सांगितले की, मालेगाव शहरात या भूमिगत योजनेचे पहिल्या टप्प्यातील ९८ कोटी ४२ लाख रुपये खर्चाचे काम सुरू आहे. यातही जीवन प्राधिकरण प्रकल्प सल्लागार आहेत. या कामाचे कार्यादेश फेब्रुवारी २०१९ ला आनंद कन्ट्रस्ट्रक्शन या मक्तेदारास देण्यात आले. कामाची मुदत २४ महिन्यांची असताना चार वर्षात ७० टक्के काम पूर्ण झाले.  विशेष म्हणजे हे काम शहराबाहेर व विना अडथळा असताना एवढा विलंब होतो आहे. शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात  किरकोळ मक्तेदार असल्यास दुसऱ्या टप्प्यातील योजनेच्या कामाची वाट लागून महत्वकांक्षी प्रकल्पाचा बट्ट्याबोळ होईल. यामुळे शहरवासियांनी या प्रश्‍नावर रान उठविले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. 

Drainage Line
Nashik : इगतपुरीतील चित्रनगरी 12 वर्षांपासून कागदावरच

टेंडरवरील आक्षेप

* अंदाजपत्रक तयार करताना सर्वेक्षण झाले नाही.

* प्रकल्पाचे रेखाचित्र तयार नाही.

* ५०० कोटींच्या या प्रकल्पासाठी किमान ५०० ते १००० कोटीची उलाढाल असलेली कंपनी हवी.

* जीवन प्राधिकरणने पाच वर्षात दीडशे कोटींची उलाढाल नमूद केली आहे.

* कमकुवत मक्तेदारास निविदा मिळावी यासाठी घाट

* २४ महिन्यात काम पुर्ण करण्याची मुदत आहे. त्यावरुन दरमहा खर्च १८ कोटी आवश्‍यक आहे.

* कमकुवत कंत्राटदार महत्वपुर्ण प्रकल्पाचे नियोजन करू शकेल काय?

* निविदेत फक्त २१.५  एमएलडी क्षमतेचा मलनिस्सारण (एसटीपी ) प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

* मलनिस्सारण प्रकल्प ६० ते ७० एमएलडीचा प्रकल्प हवा

* मुख्य पंपिंग स्टेशनचा तांत्रिक अनुभव विचारात घेण्यात आला नाही.

* ५६ किलोमीटर पाईपलाईन होणार असताना रस्ते खर्चासाठी तरतूद नाही

* यंत्रसामग्री आवश्‍यकता दर्शविलेली नाही.

* मॅन होलची तरतुद नाही.

* मक्तेदाराचे भाग भांडवल अवघे २५ कोटीचे आहे. जे खूप कमी आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com