Nashik ZP : मिशन भागिरथीमधून होणार 100 कोटींची जलसंधारणाची कामे

Nashik Z P
Nashik Z PTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेने (Nashik Z P) जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी मिशन भागिरथी (Mission Bhagirathi) हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेतून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून १२ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची ६०० कामे हाती घेतली आहेत. या कामांची रक्कम जवळपास १०० कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांमधील १५० गावांमध्ये पाच ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीकडून जलसंधारण विभागाला दरवर्षी साधारणपणे पंधरा कोटींच्या आसपास निधी येत असतो. त्यातून पुरेशी काम होत नाहीत. मात्र, जिल्हा परिषदेच्या या अभिनव योजनेमुळे रोजगार हमी योजनेतून दरवर्षी जवळपास १०० कोटींची जलसंधारणाची कामे होऊन सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

Nashik Z P
Nagpur : वेकोलित सुरु आहे ओव्हरलोड  कोळसा वाहतूक

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरगाणा तालुक्यातील काही गावांच्या सरपंचांनी विकास होत नसल्यामुळे गुजरात राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली होती. पालकमंत्री दादा भुसे यांनी सुरगाणा तालुक्यातील गावांचे सरपंच व प्रशासन यांची बैठक घेऊन सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करून तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेतला. यामुळे सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

Nashik Z P
Nashik : सिडको उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर आकारणार रोज 1 लाखाचा दंड

त्यात पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे त्या तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर होत असल्याचा मुद्दा समोर आला. हा केवळ सुरगाणा तालुक्यातीलच नाही, तर संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्‍न असल्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भागिरथी हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जलसंधारण विभागाला दिल्या. त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील १५० गावे निश्‍चित करण्यात आली आहेत.

प्रत्येक गावामध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते ३० लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधाऱ्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांच ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील व मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या सहाशे कामांची एकूण रक्कम १०० कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik Z P
Aurangabad: गुड न्यूज! औरंगाबाद लेणी-जटवाडा रस्त्याचे भाग्य उजळणार

योजनेमागील संकल्पना
सध्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून मिशन जलजीवन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या योजनेतून प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या योजनेतून प्रत्येक घराला पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. मात्र, सिंचनाचे काय, या प्रश्‍नाच्या उत्तराचा वेध घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी मिशन भागिरथी या योजनेची संकल्पना मांडली आहे.

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून जलसंधारणाच्या कामांसाठी तोकडा निधी येत असतो. त्यातून कोणाचेही समाधान होत नाही. यामुळे त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात बंधारे बांधण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व ठिकाणी एकाच वेळी बंधारे बांधून त्या गावातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवायचे. त्यातून भूजल पातळी वाढण्याबरोबरच रब्बी हंगामात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यातून पहिल्या वर्षी १५० गावांमध्ये ६०० कामे हाती घेतली जाणार आहेत.

रोजगार हमी योजनेतून बंधारे बांधण्यासाठी ९० टक्के काम यंत्राने व १० टक्के काम मजुरांकडून करून घेण्याची परवानगी आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठीचे ६०:४० प्रमाण राखत जिल्हा परिषदेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

Nashik Z P
Pune : मुंबईच्या धर्तीवर पुण्यात येणार 'एवढ्या' डबलडेकर बस

तालुकानिहाय गावे व कामांची संख्या
तालुका    गावांची संख्या  कामांची संख्या

दिंडोरी       १५              ६४
पेठ     २७              ७४
कळवण     १८               ६०
सुरगाणा     २१              ११४
सटाणा         ९               ४४
देवळा     ८               ३२
इगतपुरी   ५               १३
त्र्यंबकेश्‍वर   १२              ४६
चांदवड       १०               ३७
मालेगाव     ७                ५०
येवला     ३                १५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com