Nashik: सिग्नलवरील CCTV वरून ई-चलन कारवाई का पडली लांबणीवर?

Smart City Nashik
Smart City NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक शहरात सिग्नलवर स्मार्ट सिटी (Smart City) कंपनीकडून मार्च २०२३ पर्यन्त ८०० सीसीटीव्ही (CCTV) बसवण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत संपल्यानंतर १५ जूनची वाढीव मुदत देण्यात आली. मात्र, या मुदतीतही स्मार्टसिटी कंपनीचे सीसीटीव्ही बसवण्याचे १५९ कोटी रुपयांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे सिग्नलवरील सीसीटीव्हीवरून ई-चलनाद्वारे होणाऱ्या कारवाईची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

Smart City Nashik
Nashik : अंजनेरी-ब्रह्मगिरी दरम्यान होणार 376 कोटींचा रोपवे

गेल्या सिंहस्थापासून नाशिक शहर आयुक्तालय हद्दीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया या ना त्या कारणाने रेंगाळली आहे. सिंहस्थ काळात पोलिस आयुक्त कार्यालयाने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. दरम्यान स्मार्टसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव समोर आला.

स्मार्टसिटी योजनेतून नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी सेंसर उभारण्यात येणार आहे. केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली होती.

Smart City Nashik
मालेगावात 'या' टेंडरमध्ये 500 कोटींचा चुराडा? आयुक्तांना नोटीस

त्यात पहिल्या टप्प्यात ६०० सीसीटीव्ही बसवण्याच्या कामास काही महिन्यांपूर्वी प्रारंभही झाला. यातील वाहतूक सिग्नलवरील ४५ सीसीटीव्ही जूनच्या मध्यापासून सुरूही होणार होते. परंतु या निर्धारित वेळेतही ४५ सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत. यामुळे सीसीटीव्हीच सुरू नसल्याने ई-चलनद्वारे बेशिस्त वाहनचालकांविरोधातील कारवाईचाही मुहूर्त हुकला आहे.

वाहतूक नियंत्रण कक्षात कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे. तेथे एलसीडी वॉल उभारण्यात आली असून, प्रत्येक सिग्नलवरील सीसीटीव्ही या एलसीडी वॉलशी जोडला जाणार आहे. यामुळे ऑनलाइन ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करणे पोलिसांना सोपे जाणार आहे. मात्र, सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने न बसवल्याने ते कार्यान्वित करता आलेले नाहीत.

सिग्नल्सवरील सीसीटीव्ही सुरू करण्यात अजूनही काही तांत्रिक अडचणी आहेत. स्मार्ट सिटीकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच सिग्नल्सवरील सीसीटीव्ही सुरू होतील, असे वाहतूक शाखेकडून सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com