Nashik : स्मार्टसिटी सीसीटीव्ही टेंडर घोटाळा; मृत सीएच्या स्वाक्षरीचे जोडले कागदपत्र

Smart City Nashik
Smart City NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रकल्पांबाबत अनेक चर्चा होत असतानाच आता इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरसाठी सीसीटीव्ही बसवण्याचे ६० कोटींचे टेंडर वादात सापडले आहे. या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या टेंडरसाठी संबंधित ठेकेदाराची ३५ कोटींची वार्षिक उलाढाल आवश्यक असताना प्रत्यक्षात १९ कोटींची वार्षिक उलाढाल असलेला ठेकेदार पात्र ठरवण्यात आला.

Smart City Nashik
मृत्यू तांडवानंतर सरकारला जाग: नव्या वर्षापासून औषध खरेदी दर करारानुसार; टेंडर प्रक्रिया बंद

आणखी विशेष म्हणजे या टेंडरसाठी आर्थिक बाबींसंदर्भात जोडण्यात आलेल्या विवरणपत्रावरर आधीच मृत पावलेल्या सनदी लेखापालाची स्वाक्षरी असल्याचे कागदपत्रांवरून उघडकीस आले आहे. यामुळे या टेंडर घोटाळ्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. नगरविकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Smart City Nashik
Bullet Train : मुंबई-अहमदाबादला जोडणारा पहिला माउंटन बोगदा तयार

देशातील शहरांच्या पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारने स्मार्टसिटी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी स्मार्टसिटी कंपनी स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून शहरासाठी आवश्यक प्रकल्पांची उभारणी केली जाते. या स्मार्टसिटी योजनेची मुदत संपत आली असून आता मंजूर झालेली कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प गुंडाळला जाणार आहे. दरम्यान नाशिकमध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पाची वाट लावली असल्याचे नागरिकांना पदोपदी जाणवत असते. स्मार्ट सिटी कंपनीने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसह्यता येण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काही प्रकल्पांची निवड केली असून त्यात ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण ठेवणारे कंट्रोल कमांड सेंटर, तसेच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, देखभाल करणे यासाठी पाच जुलै २०२२ रोजी टेंडर राबवण्यात आले. कमीत कमी ३५ कोटींची वार्षिक उलाढाल असणा ठेकेदारच या टेंडरमध्ये सहभागी होऊ शकेल, अशी अट यात नमूद करण्यात आली होती. मात्र, मेसर्स सेक्युटेक ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची वार्षिक उलाढाल १९ कोटीपेक्षा कमी असतानाही त्यांचे टेंडर मंजूर करण्यात आले. या कंपनीने आर्थिक उलाढाल व आर्थिक विवरणपत्रासंदर्भात दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच कंपनीला पात्र करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. या ठेकेदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा न करताच डोळेझाक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Smart City Nashik
Vasai Virar : 40 ई-बससाठी तिसऱ्यांदा Tender काढण्याची पालिकेवर नामुष्की

मृत सीएचे विवरणपत्र
मेसर्स सेक्युटेक ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सीसीटीव्ही संबंधी कामाचा ठेका मिळवण्यासाठी मृत सीएचे विवरणपत्र वापरण्यात आले आहे. कंपनीकडून रामदास उबाळे यांच्या नावाचे २१ जुलै २०२२ रोजी विवरणपत्र सादर करण्यात आले. त्यांचा सीए क्रमांक १०६००३५ आहे. मात्र, उबाळे यांचे १८ एप्रिल २०२० रोजी निधन झाले. त्यामुळे यामागे टेंडर मंजूर करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com