Nashik : साडेतीन कोटी खर्च करून होणार 'या' वास्तुचे नूतनीकरण

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिकमधील जवळपास पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेने साडे तीन कोटी रुपये खर्च करून परशुराम सायखेडकर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik
CAG : हाफकीनचा अंदाधुंद कारभार; 50 कोटींच्या नुकसानीला जबाबदार GM सुभाष शंकरवारना पुन्हा मुदतवाढ कशी?

यामुळे शहरातील रंगकर्मीची अस्मिता असलेल्या वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृहातून आता रंगकर्मीना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. हे नूतनीकरण दात्यांच्या देणग्यांमधून केले जाणार असल्याने रंगकर्मी व नाशिककर रसिक यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन अध्यक्ष दिलीप फडके यांनी केले आहे.

रंगभूमी दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेत रंगभूमी पूजन करताना शहरातील नाट्यकलावंतांसह रसिकांना संचालक मंडळाने प. सा. नाट्यगृह नूतनीकरण करण्याची घोषणा करून आगळी वेगळी भेट दिली आहे.प. सा. नाट्यगृहात झालेली दुरवस्था आणि त्यावर वेळोवेळी काम करूनही रसिकांना आणि रंगकर्मींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर आता कायमस्वरूपी तोडगा म्हणून या नाट्यगृहाचे आतून नूतनीकरण करण्यात येते आहे.

Nashik
Mumbai Pune : मुंबई-पुणे 20 मिनिटांत! Altra Fast Hyperloop प्रोजेक्टबाबत मोठी बातमी...

रंगभूमी दिनानिमित्त सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, सुनील कुटे आणि शहरातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या उपस्थितीत नेपथ्यकार शाम लोंढे यांनी नूतनीकरण केल्यानंतर प. सा. नाट्यगृहात मिळणाऱ्या सुविधांचे सादरीकरण केले. सायखेडकर नाट्यगृहात सध्या ५१३ खुर्च्या असून ती संख्या वाढवून आता ६१२ होणार आहे.  रंगमंचाचा आकार वाढवितानाच विंग्ज, पडदे, लाईट्स आणि सभागृहातून रंगमंचावर येण्याजाण्यासाठी बाजूच्या भिंतीला जिना यावर विशेष काम करण्यात येणार आहे.

रंगकर्मींसाठी दोन अत्याधुनिक मेकअप रूम, लेडीज चेंजिंग रूम, गेस्टरूम, पॅसेज, पॅन्ट्री, नाटकांसाठी वा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या इतर अनेक तांत्रिक बाबींवर काम करण्यात येणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com