Nashik: रस्ते खोदाल तर याद राखा! पालिका दाखल करणार फौजदारी गुन्हा

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या (NMC) बांधकाम विभागाने गुरुवार (ता. ११) पासून MNGL सह खासगी कंपन्या तसेच इतर कोणालाही रस्ते फोडण्यावर बंदी घातली आहे. त्यानंतरही कोणी रस्ते फोडताना आढळल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिला आहे. त्यामुळे शहरातील सहाही विभागातील बांधकाम अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.

Nashik Municipal Corporation
Vadodara-JNPT मार्ग प्रगतीपथावर; बेंडशीळ गावाजवळ 4.5 किमी बोगदा

गेला काही वर्षात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, बीएसएनएल, तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. एमएनजीएल अर्थात महानगर गॅस लिमिटेड कंपनीमार्फत सध्या जवळपास १८७ किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले आहेत. या रस्ते खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असून, अनेक ठिकाणी अपघात होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.

वीजपुरवठा, पाणीपुरवठा खंडित होणे यासारख्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. मागील वर्षी पावसाळ्यात रस्ते खोदाई काम सुरू असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात अपघात झाले होते. पावसाळा लांबल्यामुळे कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्यामुळे खड्डयातून वाहने चालवताना नाशिककरांची हाडे खिळखिळी झाल्यागत अवस्था होती.

Nashik Municipal Corporation
Nashik: दादा भुसेंना दिलेले 'ते' आश्‍वासन हवेतच विरणार का?

पालिकेवर झालेली टीका लक्षात घेत यंदा ताकही फुंकून पिण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी वा मोबाइल कंपन्या किंबहुना अन्य खासगी संस्थांना व्यावसायिक कारणास्तव रस्ता खोदण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतच मुभा होती. मात्र, खासगी कंपन्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली होती. त्यानुसार पालिकेने मुदतवाढ दिली. ती मुदत संपल्यानंतरही त्यांनी नवीन मुदत मागितली गेली. मात्र, पालिकेने नवीन मुदतवाढ देण्यास नकार देत रस्ते खोदकामावर बंदी घातली आहे. तसेच अपूर्ण रस्ते २५ मे २०१३ पर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली आहे.

नव्या निर्णयानुसार ११ मेपासून एमएनजीएलसह मोबाईल कंपन्यांसह कोणत्याही खाजगीठेकेदाराने रस्ता खोदल्याचे आढळल्यास संबधितांविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. केवळ ठेकेदारच नव्हे तर ज्या भागात रस्ता खोदला जाईल तेथील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनाही जबाबदार धरले जाईल असाही इशारा दिला आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : ठेकेदारांनी पाठ फिरवल्याने नवे वाळू धोरण संकटात?

दरम्यान रस्ते खोदकामास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. एमएनजीएलसह खासगी कंपन्याना रस्ते खोदण्यासाठी दिलेली मुदतवाढ बुधवारी (ता. १०) संपुष्टात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून रस्ता खोदल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com