Property Tax: डॉ. पुलकुंडवार आक्रमक; 31 कार्यालयांना मनपाचा दणका

Dr. Pulkunwar Nashik
Dr. Pulkunwar NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेने (NMC) गेल्यावर्षी अंदाजपत्रकात (Budget) गृहित धरलेल्या उत्पन्नात (Revenue) डिसेंबरअखेरपर्यंत साडेचारशे कोटी रुपयांची तूट आली आहे. मार्च अखेरपर्यंत ही तूट आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे उत्पन्नवाढीसाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतला जात आहे.

Dr. Pulkunwar Nashik
Pune: बकोरियांच्या दणक्याने PMPचा 'टॉप गियर'; उत्पन्नचा नवा विक्रम

घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. करसंकलन विभागाने यावर्षी १०० टक्के वसुली करावी, यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. यामुळे करसंकलन विभागाकडून मालमत्ता कर थकवलेल्या मोठ्या थकबाकीदारांचा शोध घेतला जात असून त्यात शहरातील सर्व सरकारी कार्यालयांनीच महापालिकेचा जवळपास ९ कोटी ९१ लाख रुपये मालमत्ता कर थकवल्याचे समोर आला आहे.

यामुळे करसंकलन विभागाने आता या सरकारी कार्यालयांकडून वसुली करण्यासाठी मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला असून करवसुलीसाठी प्रसंगी जप्तीची कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

Dr. Pulkunwar Nashik
Nashik: 10 हजार कोटींतून साकारणार 60 किमीचा बाह्यरिंगरोड प्रकल्प

महापालिका हद्दीत अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यातील ३१ शासकीय कार्यालयांकडे वर्षांनुवर्ष मालमत्ता कर थकला आहे. शासकीय कार्यालयांक ९ कोटी ९१ लाख रुपये थकबाकी वसूल करणे महापालिकेसाठी अवघड जागेचं दुखणं झाले आहे. करसंकलन विभागाने या शासकीय कार्यालयांन वारंवार स्मरण पत्र पाठवले आहे. मात्र, या कार्यालयांकडून महापालिकेला काहीही प्रतिसाद मिळत नाही. शासकीय कार्यालये दाद देत नसल्याने करसंकलन विभाग त्यांच्यावर मालमत्ता जप्तीच्या कारवाईच्या विचारात आहे. यामुळे मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीच्या कारवाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

शासकीय कार्यालयांवर थेट कारवाई करता येत नसली तरी त्यांच्याकडून थकबाकी वसुली व्हावील यासाठी जप्तीची कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली जाणार आहे. यावर सहकार्य न केल्यास महापालिका कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर जप्तीची कारवाई देखील करू शकते.

Dr. Pulkunwar Nashik
Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

नाशिक महापालिकेचा मालमत्ता थकबाकीचा आकडा जवळपास पाचशे कोटींच्या घरात होता. करसंकलन विभागाने ढोल बजाओ, स्मरणपत्रे, नळ कनेक्शन तोडणे, वारंट बजावणे आदी कारवाईच्या माध्यमातून जवळपास दीडशे कोटींच्या आसपास थकबाकी वसूल केली आहे. पण शासकीय कार्यालयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीचा प्रश्‍न अधिक जटील झाला आहे.

Dr. Pulkunwar Nashik
Nashik PWD : 1300 कोटींच्या प्रशासकीय मान्यता पण 150 कोटींचाच निधी

शासकीय कार्यलयाकडील थकीत कर

कार्यालय            थकित रक्कम

जिल्हाधिकारी - ११,१७,८२९
बीएसएनल - १,७१,३६,७४१
जिल्हा रुग्णालय - १,३१,६९६
तहसीलदार - १५४१२८
धान्य वितरण कार्यालय. ना.रोड - ८२१६४७४
महसूल आयुक्त - २५२८६२२८
सेंट्रल डिफेन्स - १७३८७८
शासकीय तंत्रनिकेतन -४०५७९२४
रेल्वे स्टेशन - ९७२५४५
नगररचना नाशिकरोड - १९२४८१७
बांधकाम विभाग - ३४६६६
पोलिस आयुक्त -  २११९४२६
अबकारी कर     -  ५३४८३१
आयकर          -   १८९५१७०९
पोलिस अधीक्षक -  २७६४०
सीडीओ मेरी      -  ४७६७८
विद्युत भवन      -  १९२९०२
कमिशनर पोलिस सिटी - ३७५६१८
पोस्ट ऑफिस - २९३०२९०
जिल्हा परिषद - १७२८९३
सह अभियंता सिव्हिल - २२०४९९८

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com