Nashik : 'त्या' 2 महिला सरपंचांच्या मालमत्तेवर का आली टाच? ग्रामसेवकालाही दणका

Nashik ZP
Nashik ZPTendernama
Published on

नाशिक (Nashik) : मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीत तीन वर्षांच्या काळात दोन सरपंच व एका ग्रामसेवकाने ८० लाख रुपयांचा अपहार केल्यानंतर त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन महिला सरपंच व त्यांच्या पतींच्या ३९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर पंचायत समितीने टाच आणली असून ग्रामसेवकाच्या वेतनातून उर्वरित रकमेची भरपाई केली जात आहे.

या ग्रासेवकांची सध्या जिल्हा परिषद पातळीवर चौकशी सुरू असून त्या चौकशीनंतर संबंधिताविरोधात कारवाई केली जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये अपहार झाल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. मात्र, सरपंचांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा हा प्रकार अलिकडच्या काळात प्रथमच घडला आहे. या प्रकरणामुळे ग्रामपंचायत पातळीवर दिल्या जात असलेल्या निधीचे काय होते, ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

Nashik ZP
Pune Airport : पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल पाहताच ज्योतिरादित्य शिंदेंचा का चढला पारा?

मालेगाव तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायतीत आलेल्या निधीतून कामे न करताही निधी खर्च झाल्याची बाब गावातीलच रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत तीन वर्षे पाठपुरावा करीत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास मंत्रालय येथे १४८ अर्ज केले.

प्रशासन दाद देत नसल्याचे बघून चारवेळा उपोषण केले. त्यानंतर प्रशासनाने अखेरीस ही कारवाई केली असल्याचे पत्र त्यांना मागील महिन्यात दिले आहे. आता ग्रामसेवकाची विभागीय चौकशी सुरू असून त्यानंतर ग्रामसेवकांविरोधातही कारवाई होणार आहे.

असे आहे प्रकरण

मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीला वित्त आयोग व इतर योजनांमधून सुमारे ८० लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. वेगवेगळ्या चार खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली होती. मात्र, या निधीतून विकास कामे न करताच ती रक्कम परस्पर काढून घेतली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मोरे यांच्या लक्षात आली. त्यांनी ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करून निधी खर्च केलेल्या कामांची कागदपत्रे मागवली. मात्र, ग्रामपंचायतीने दाद दिली नाही. यामुळे त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांना पाठवून या तक्रार अर्जानुसार चौकशी केली. संबंधित गटविकास अधिकारी यांनी सातवेळा ग्रामपंचायतीत येऊन त्यांन चौकशी केली. त्यांना या निधी खर्चाबाबतचे कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात आले नाहीत. यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्याबाबतचा अहवाल त्यांनी गटविकास अधिकारी यांनी दिला.

त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी तीन सदस्यीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी केली. त्यात खडकी ग्रामपंचायतीमध्ये ८० लाख रुपयांच्या सरकारी निधीचा अपहार झाला असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी अपहार झालेली रक्कम सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून समप्रमाणात वसूल करण्याचा निर्णय घेतला.

Nashik ZP
Nashik : येवल्यासाठी छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज! 'या' कामांसाठी तब्बल 10 कोटींचा...

या निधी अपहाराच्या काळात दोन महिला सरपंच होत्या. त्यामुळे प्रतिभा सूर्यवंशी व अर्चना देवरे दोन्ही सरपंचांकडून ३९ लाख ४२ हजार ४८० रुपये वसूल करण्यासाठी त्यांच्या व कुटुंबीयांच्या मालमत्तेवर सरकारी वसुलीचा बोजा टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवक सुनील खैरनारकडून उर्वरित ३९ लाख ४२ हजार ४८० रुपयांची वसुली करण्यासाठी त्याच्या वेतनातून रक्कम कपात केली जात आहे.

सध्या ग्रामसेवकाची जिल्हा परिषद स्तरावर विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीनुसार ग्रामसेवकाविरोधात पुढील कारवाई होणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com