Nashik News : का रखडला 'नमामि गोदा’चा DPR? महापालिकेने सल्लागार संस्थेला का दिली ताकीद?

Namami Goda
Namami GodaTendernama
Published on

Nashik News नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदी (Godavari River) पुनरुज्ज्वीत करण्यासाठी 'नमामि गोदा' (Namami Goda) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केलेली असून या संस्थेने अद्याप प्रकल्प अहवाल तयार केला नाही.

Namami Goda
ठाणे-कळवा ते कल्याण समांतर रस्ता बांधणार; श्रीकांत शिंदे यांची कल्याणच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कशी आहे?

तसेच महापालिकेच्या विविध विभागांनी सूचवलेल्या कामांचाही या अहवालात समावेश केलेला नाही. यामुळे महापालिकेने सूचवलेल्या कामांचाही समावेश न केल्यामुळे या संस्थेला महापालिकेच्या वतीने ताकीद देण्यात आली असून लवकरात लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतानाच नवीन कामांचा त्याच समावेश करण्याच्या सूचना शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिल्या आहेत.

त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली दक्षिणगंगा अर्थात गोदावरी नाशिक शहरातून १९ किलोमीटर जाते. नाशिकला गोदावरी घाटावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरत असल्याने जगभरात नाशिकचे धार्मिक महत्त्व आहे. गोदावरीत स्नानासाठी लाखो भाविक येतात. मात्र, नाशिक शहराचे वाढते नागरिकरण, औद्योगिकरण व सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणा अपुरी असणे या कारणांमुळे सांडपाण्याचे पाणी अनेक ठिकाणी थेट गोदावरीत मिसळत असतात. यामुळे शहर परिसरात गोदावरीला अक्षरश: गटारीचे स्वरुप येऊन प्रदूषण वाढले आहे.

Namami Goda
Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

गोदावरी स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही गोदावरीचे प्रदूषण कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे केंद्र सरकारने वाराणशीमध्ये गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी 'नमामि गंगा' प्रकल्प राबवला. त्याच धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदी सौंदर्याकरण व प्रदूषणमुक्तीसाठी 'नमामि गोदा' प्रकल्प राबवण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले असून २०२० मध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने तत्वता १७०० कोटी रुपये देण्यास मान्यता देतानाच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.

महापालिकेने सल्लागार संस्थेची नियुक्तीही केली. मात्र, प्रकल्प अहवाल तयार करण्याची मुदत संपूनही संबंधित सल्लागार संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला नाही. मागील जानेवारीत नमामि गोदा प्रकल्पाबाबत संबंधित कंपनी व महापालिकेचे संबंधित विभाग यांची संयुक्त बैठक झाली. त्यात महापालिकेच्या विविध विभागांकडून गोदावरी सौंदर्याकरण, मलजल व्यवस्था, स्वच्छता या बाबींच्या कामांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना यात सूचनांचा समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले होते.

Namami Goda
Pune News : कोणी केली 'आयटी'ची कोंडी? जबाबदार कोण?

दरम्यान लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिका मुख्यालयात सल्लागार संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. त्यावेळी अद्याप सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला नसून जानेवारी महापालिकेच्या विभागांनी सूचवलेल्या कामांचाही या अहवालात समावेश केला नसल्याचे आढळून आले. यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना नव्या सूचनांचा अहवालात समावेश करण्याची ताकीद देतानाच लवकरात लवकर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नमामि गोदा प्रकल्पातील प्रमुख कामे
- नदीत मिसळणारे गटारींचे पाणी थांबवणार
- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमतावाढ
- कारखान्यांमधून बाहेर पडत असलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर
- गोदाघाटाचा विकास व सौंदर्यीकरण

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com