Nashik: Neo Metro प्रकल्पात का झाली पीएमओची एन्ट्री?

Metro Neo
Metro NeoTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिका अधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारीस सादरीकरण केल्यानंतर महिनाभरात पीएमओच्या सल्लागार सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महामेट्रो, महारेल आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी नाशिकमधील निओ मेट्रो (Neo Metro) प्रकल्पाबाबत चर्चा केली.

यावेळी नाशिकरोड येथे प्रस्ताविक करण्यात आलेल्या मल्टिमॉडेल हब बाबत सविस्तर तांत्रिक माहिती पीएमओकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Metro Neo
Good News: 'समृद्धी'चा 85 किमीचा शिर्डी ते इगतपुरी टप्पा पूर्ण

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शहरासाठी निओ मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून या प्रकल्पास तत्वता मंजुरी मिळाली. त्यानुसार महापालिकेने निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला व पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र, तब्बल दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पडून आहे.

राज्यात मागील जूनमध्ये पुन्हा सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे निओ मेट्रो प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या. दरम्यान या प्रकल्पाची फाईल पंतप्रधान कार्यालयात मान्यतेसाठी असल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या महिन्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोपासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रोसाठी एकच मोडूल लागू करण्याबाबत विचार सुरू झाल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकल्पाबाबत हालचाली गतीमान झाल्या आहेत.

Metro Neo
Ajit Pawar : अजितदादा कडाडले...आश्वासने नकोत, तारीख सांगा!

महामेट्रोचे एमडी डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मागच्या महिन्यात पीएमओच्या सचिवांसमोर मेट्रो निओचे सादरीकरण करत, मेट्रो निओचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) पीएमओकडे पुन्हा सादर केला. त्यनंतर एक महिन्यात पीएमओचे सल्लागार सचिव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महामेट्रो, महारेल आणि महापालिका आयुक्तांसमवेत या प्रकल्पाबाबत चर्चा केली. डॉ. दीक्षित यांच्यासह महापालिका प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पीएमओचे सल्लागार सचिव शर्मा यांनी महामेट्रोची तांत्रिक माहिती जाणून घेतली.

दरम्यान, नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, मेट्रो निओ आणि सिटी लिंकचे एकत्रित स्टेशन उभे केले जाणार आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या मल्टिमॉडेल हबबाबत सविस्तर तांत्रिक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Metro Neo
BKC स्टेशनचे टेंडर MEIL-HCCच्या खिशात; तब्बल 3,681 कोटींची बोली

मेट्रो निओ एक दृष्टीक्षेप

प्रकल्पासाठीचा खर्च  : २१००.६ कोटी रुपये
केंद्र सरकारचा वाटा : ७०७ कोटी रुपये
राज्य सरकार, सिडको, मनपाचा वाटा : २५५ कोटी रुपये
कर्ज उभारणार : ११६१ रुपये
एका बसची लांबी : २५ मीटर
प्रवाशी क्षमता : २५०
दोन एलिव्हेटेड मार्ग : प्रत्येकी ३१ किमी
मार्गावरील स्थानके : २९

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com