Nashik : घरपट्टी वसुलीत महापालिकेची आघाडी; डिसेंबरअखेर 152 कोटींची वसुली

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या विविध कर संकलन विभागासमोर दरवर्षी कर संकलनाचे मोठे आव्हान असते. मात्र, मागील वर्षभरापासून केल्या गेलेल्या विविध उपयोजनांमुळे करसंकलन विभागाने एप्रिल ते डिसेंबर या काळात तब्बल १५२ कोटी ७६ लाख ९ हजार ९० रुपये घरपट्टी करवसुली केली आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली बावीस कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी याच कालावधीत १३० कोटींची वसुली करण्यात आली होती. महापालिकेच्या करसंकलन विभागाला २०५ कोटींचे उद्दिष्ट असून, आठ महिन्यांत पाच महिन्यांतच सत्तर टक्क्यांहूनअधिकची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : नाशिककरांना 'न्यू इअर गिफ्ट'; 'या' सहापदरी महामार्गासाठी निघाले 275 कोटींचे टेंडर

महापालिकेचे नगररचना व करसंकलन हे दोन विभाग प्रामुख्याने उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. करसंकलन विभागाने मागील वर्षी १८८ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला होता. त्यामुळे या वर्षासाठी दोनशे कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी करवसुली करण्यासाठी पालिकेच्या नाकीनऊ आले होते. मोठ्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रक्रिया राबवून ढोल पथक नियुक्त केले होते.

या ढोल बजाओ मोहीमेतून घरपट्टी वसुली करण्यावर भर दिला होता. तसेच करवसुलीसाठी महापालिकेकडील मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे करवसुलीचे खासगीकरण करण्याबाबतही चाचपणी केली गेली. मात्र, पुढे तो प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला.

महापालिकेने मागील वर्षी सर्व सरकारी कार्यालयांकडील घरपट्टी वसुलीसाठी नियोजन केले. तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांकडील थकबाकी वसुलीसाठीही महापालिकेने त्यांच्या कार्यालयांच्या परिसराची मोजणी करून काही थकित कर वसूल करण्यावर भर दिला आहे. या आर्थिक वर्षात महापालिकेचा करसंकलन विभाग वसुलीत जोरात आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik : सिन्नरच्या मुसळगाव-माळेगाव एमआयडीसीना रिंगरोडने जोडणार

करसंकलन उपायुक्त श्रीकांत पवार यांनी विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नियोजन सूत्रबद्ध रीतीने करत वसुलीवर काम केले. त्यामुळेच आठ-नऊ महिन्यांत मालमत्ता करवसुली आकड्याने मोठी झेप घेतली आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने  १ एप्रिल ते ३० जून या सवलतीच्या कालावधीत जवळपास शंभर कोटींचा टप्पा ओलांडला होता. यानंतरही कर वसुलीला उत्तम प्रतिसाद असून, हा आकडा आता थेट दीडशे कोटींच्या पुढे पोहोचला आहे. सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे.

महापालिकेने केलेल्या कर वसुलीच्या प्रमाणावर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी देण्याबाबत केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. यामुळे महापालिकेकडून सध्या असलेल्या करांची अधिकाधिक वसुली करण्यावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे कर आकारणीचे नवनव्या मार्गांचाही शोध घेतला जात आहे. महापालिका आयुक्तांनी करसंकलन विभागाला या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे २१० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे.

गतवेळेस डिसेंबरअखेर वसुली आकडा जेमतेम १२५ कोटींवर पोहचली होता. मात्र, यंदा डिसेंबरमध्ये या करवसुलीने दीडशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नागरिक रोख, धनादेश, डीडी, आरटीजीएस व ई-पेमेंटच्या माध्यमातून कर भरत आहेत. पाणीपट्टीचे यंदा ७५ कोटींचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ३३ कोटींची वसुली झाली आहे. यामुळे यापुढील काळात पाणीपट्टी वसुलीवर भर दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com