Nashik : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी होणार 70 कोटी खर्च

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजनेतून नाशिक महापालिकेला ७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून वडाळा-पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ असे तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून दुभाजकांच्या मध्यभागी वृक्ष लागवड, विद्युत शवदाहिनी, बांधकाम कचरा विल्हेवाट प्रकल्प आदींची उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे लवकरच २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करणार असून यांत्रिकी झाडू खरेदीचे टेंडर प्रक्रिया झाली आहे.

Nashik
'टेंडरनामा'ने उघड केलेला 500 कोटींचा घोटाळा गाजला विधान परिषदेतही

केंद्र सरकारकडून देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी निधी देण्यात येतो. नाशिक महापालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे सर्वेक्षण नोंदवण्यात आल्याने त्यानुसार जवळपास ७० कोटी निधी हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी देण्यात आला आहे. या निधीतून हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदवण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे. वडाळा पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ असे तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत यांत्रिकी झाडू खरेदी केले जाणार आहे. त्यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया पार पडली आहे.

Nashik
'टेंडरनामा'ची अजितदादांकडून दखल; DGIPRच्या अधिकाऱ्यांना.. (VIDEO)

हवा गुणवत्ता सुधारण्याचा भाग म्हणून लाकडावरील शवदहनाला पर्याय म्हणून विद्युतदाहिनी हा पर्याय आहे. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दसक, पंचवटी व मोरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये विद्युत शवदाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्युतदाहिनीसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Nashik
Tender : शरणापूर-साजापूर रस्त्याच्या टेंडरमध्ये कोणाचा दबाव?

दुभाजकांमध्ये शोष वनस्पती

हवेतील नायट्रोजन, सल्फरडाय ऑक्साईड, असे विषारी घटक शोषून घेणाऱ्या वनस्पती रस्ता दुभाजकांमध्ये लावल्या जाणार आहे. त्याचबरोबर एकीकृत सिग्रल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसवणे आदी कामे केली जाणार आहेत.

डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प

नाशिक महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्पासाठी तरतूद केली आहे. "एन- कॅप' अंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधकाम विल्हेवाट प्रकल्प उभारला जाणार आहे. बांधकाम साइटवर ग्रीन नेट लावण्याबरोबरच बांधकाम डेब्रिजची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. पाथर्डी येथील खत प्रकल्पाच्या बाजूला नवीन प्रकल्प असेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com