Nashik : महापालिका शिडीसाठी मोजणार युरोमध्ये पैसे; फिनलँडमधील कंपनीला टेंडर

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : बांधकाम विषयक नवीन नियमावलीत शहरात ९० मीटर उंच इमारत बांधण्यास परवानगी असल्याने भविष्यात मोठ्या उंचीच्या इमारती तयार होऊन त्यात आग लागण्याची दुर्घटना घडल्यास तेथपर्यंत अग्निशमन व्यवस्था पोचण्यासाठी तेवढ्या उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्यासाठी फिनलँड देशातील कंपनीचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ‘युरो’मध्ये महापालिका शिडीसाठी पैसे मोजणार आहे. जवळपास ३८ कोटीचा खर्च नवीन शिडी खरेदीसाठी केला जाणार असून हा खर्च महापालिकेवर बंधनकारक आहे.

Nashik Municipal Corporation
Mumbai : समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या 4 हजार कोटींच्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोळ; कोणी केला आरोप?

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संपूर्ण राज्यासाठी २०१९ मध्ये एकिकृत विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीपीआर) लागू केल्याने शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी दिली जात होती. नाशिकमध्ये वाढते शहरीकरणामुळे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात गगनचुंबी इमारती उभ्या राहण्यास सुरवात झाली. या इमारतींमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास शेवटच्या मजल्यापर्यंत पोचण्यासाठी हायड्रोलिक शिडीची आवश्यकता लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म) खरेदी प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार २०१८ मध्ये ९० मीटर उंचीची शिडी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, ज्या कंपनीला ऑर्डर दिली, तीच कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यामुळे सदर कंपनीकडून ३१ मे २०२३ पर्यंत ही शिडी अग्निशमन विभागाला न मिळाल्याने नगररचना विभागाने ७० मीटर उंचीच्या बांधकामांना बंदी घातली. परंतु सदर निर्णय अंगलट येण्याची शक्यता असल्याने चोवीस तासातच निर्णय फिरविला.

Nashik Municipal Corporation
Nashik : विशिष्ट ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासाठीच 'ZP'कडून 'या' टेंडरला विलंब

अग्निशमन शिडी खरेदीला मंजुरी मिळालेली असल्याने महापालिका नगररचना विभागाकडून ७० मीटर उंचीपेक्षा अधिक अशा १८ मोठ्या गृहप्रकल्पांना बांधकामाची मंजुरी दिली होती. महापालिकेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे व्यावसायिक, ग्राहकांमध्ये संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने निर्णय फिरविला गेला. दरम्यान, दुसरीकडे अग्निशमन विभागाने शिडी खरेदीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात फिनलँड येथील मे. वेसा लिफ्ट ओये कंपनी वगळून त्याऐवजी ब्रान्टो स्कायलिफ्ट कंपनीला काम देण्यात आले आहे. युरोपियन कंपनी असल्याने युरोमध्ये पेमेंट दिले जाणार आहे.

‘आरटीओ’ला विनंती

महापालिकेने फिनलँड येथून खरेदी केलेली ३२ मीटर उंचीपर्यंत पोचू शकणारी अग्निशमन शिडीचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने २८ जुलै २०२३ ला या वाहनाची फिटनेस टेस्ट केली. परंतु पंधरा वर्षे पूर्ण होत असल्याने फिटनेस सर्टिफिकेट दिले नाही. आपत्कालीन परिस्थितीत उद‌‌्भवल्यास संकटावर मात करण्यासाठी किमान अस्तित्वातील ३२ मीटर उंचीच्या शिडीसाठी जुने वाहन बदलून नवे वाहन खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती आरटीओ विभागाला प्रशासनाकडून केला जाणार आहे.

''९० मीटर उंचीच्या इमारतींसाठी अग्निशमन शिडी खरेदीसाठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली असून, फिनलँड येथीलच कंपनी पात्र ठरली. लवकरच कार्यारंभ आदेश दिले जातील. अस्तित्वातील ३२ मीटर उंचीच्या अग्निशमन शिडीचे कालबाह्य झालेले वाहन बदलण्यासाठी आरटीओला विनंती केली जाणार आहे.''

- संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com