Nashik : महापालिकेचा कामटवाडेतील ‘एसटीपी’साठीही फुकटातल्या जागेचा शोध

STP plant
STP plantTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेकडे भूसंपादनासाठी निधी नसल्याने मखमलाबाद येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्राऐवजी तो प्रकल्प तपोवनातील आधीच्या प्रकल्पालगतच उभारण्याचे प्रस्तावित केल्यानंतर आता कामटवाडे येथील प्रस्तावित ५६ एमएलडी क्षमतेचा मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) अबंड औद्योगिक वसाहतीतील जागेत उभारण्याची चाचपणी सुरू केली आहे.

STP plant
176 कोटींच्या स्वच्छतेच्या कामासाठी 'वैद्यकीय शिक्षण'ची नामी युक्ती; टेंडर प्रक्रियेला फाटा

त्यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयास जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक वसाहतीत महापालिकेने रासायनिक, सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प उभारावा, अशी उद्योजकांची जुनी मागणी आहे. त्यामुळे कामटवाडे येथे मलनिस्सारण केंद्रासाठी भूसंपादनाचा खर्च वाचवत एमआयडीसीतच दोन्ही उद्देशाने एकच मलनिस्सारण केंद्र उभारण्याबाबत महापालिका विचार करीत आहे.

STP plant
Mumbai : मरीन ड्राईव्ह ते मिरा भाईंदर सुसाट; 24 हजार कोटींचे बजेट

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील अकरापैकी नऊ मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण व क्षमतावाढ करण्याचा तसेच काही ठिकाणी नवीन मलनिस्सारण केंद्र उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. अमृत योजना, नमामि गोदा प्रकल्प व राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेतून हे प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने ही कामे प्रस्तावित केली आहेत. मात्र, अद्याप एकाही योजनेत त्या कामांचा समावेश झालेला नाही. मागील सिंहस्थात महापालिकने मखमलाबाद व कामटवाडे येथे प्रस्तावित एसटीपीसाठी शहर विकास आराखड्यात आरक्षण ठेवले होते. मात्र, या जागांची किंमत आजमितीला कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे.

STP plant
Mumbai-Goa Highway : भूसंपादनाचे प्रस्ताव 15 दिवसांत निकाली काढा: नितीन गडकरी यांचे निर्देश

भूसंपादनासाठी दीडशे ते दोनशे कोटी खर्च होईल. सद्यस्थितीत मनपाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, असे कारण देत महापालिकेने या दोन्ही मलनिस्सारण केंद्रांसाठी पर्यायी जागेच शोध सुरू केला आहे. मध्यंतरी अंबड व सातपूर औद्योगिक वसाहती महानगर पालिकेने मलनिस्सारण केंद्र उभारावा, अश आग्रही मागणी उद्योजकांनी केल होती. कामटवाडे ऐवजी औद्योगिक वसाहतीतच एसटीपी उभाराव व त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने जागा उपलब्ध करू द्यावी, अशी मनपाची अपेक्षा आहे. एमआयडीसीने जागा उपलब्ध करून दिल्यास औद्योगिक वसाहत व शहरासाठी मलनिस्सारण केंद्र उभारणे शक्य होईल. तसेच कामटवाडे येथील प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रासाठीचा भूसंपादनाचा खर्चही वाचेल, असा महापालिकेचा हेतु आहे. यामुळे महापालिकेने औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास जागा उपलब्ध करून द्यावी, यासा पत्र पाठवणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com