Nashik : आयटीपार्क, लॉजिस्टिक पार्कची जबाबदारी सरकारवर सोपवली

२४७५ कोटींच्या बजेटमध्ये करवाढीचे संकट टळले
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेचे कोणतीही करवाढ नसलेले  २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे २४०० कोटीचे अंदाजपत्रक मुख्य व वित्त लेखाधिकारी नरेंद्र महाजन यांनी स्थायी समितीला सादर केले. या निधीतून नवीन विकासकामांसाठी ४७० कोटीची तरतूद करण्यात आली असून यापूर्वी घोषणा केलेल्या योजनाच पुन्हा नव्याने अंदाजपत्रकात समाविष्ट करून सादर केल्या आहेत. तसेच आयटी पार्क, लॉजिस्टीक पार्क या प्रकल्पांच्या उभारणीची जबाबदारी शासनावरच टाकण्यात आली आहे.

Nashik Municipal Corporation
Eknath Shinde : विकासकामांतून मुंबईचा चेहरामोहरा बदलणार

आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे २३७७ कोटींचे सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी घेतानाच २०२३- २४ या आर्थिक वर्षांचे २४७५.८६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक १ कोटी २१ लाख रुपये दर्शवण्यात आली आहे. अंदाजपत्रकात यंदा घरपट्टी व पाणीपट्टीसह इतर कुठलीच करवाढ लागू केलेली नाही. उत्पन्न वाढीसाठी खासगीकरणाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकाम नळजोडण्या शोधण्यासाठी संस्था नियुक्त करून कर लावला जाणार आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik ZP : वर्ष संपत आले तरी 42 कोटींचे नियोजन होईना?

शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलवाहिका, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी तरतूद करताना शहराच्या समतोल विकासाचा प्रयत्न केला गेल्याचा दावा डॉ. पुलकुंडवार यांनी या अंदाज पत्रकात केला आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण संवर्धन, नमामि गोदा वैद्यकीय सेवा, आयटी पार्क विकसित करण्याच्या बाबींवर अंदाजपत्रकाच्या माध्यमातून भर देण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदन पुलकुंडवार यांनी केले आहे. महापालिकेच्या माध्यमातून टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर व फॅसिलिटी सेंटर उभारले जाणार आहे. राज्य शासनाच्या २०२१ च्या इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणानुसार महापालिकेकडून शहरात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एन कंपमधून १० कोटी निधी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने शहरात चार्जिंग स्टेशनकरिता १०६ ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. बीओटी तत्त्वावर निविदा काढून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन करण्याचा मानस असल्याचे अंदाजपत्रकात स्पष्ट केले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik ZP : कामांवरील स्थगिती पथ्यावर; उत्पन्नात नऊ कोटींची वाढ

बाह्य वळणावर ट्रक टर्मिनस
महापालिकेने आडगाव येथील जकात नाक्याच्या बाजूला ट्रक टर्मिनस विकसित केला आहे. परंतु, सध्या हा ट्रक टर्मिनस बंद पडले असून, त्याचा ताबा घेतला आहे त्यामुळे या पारंपरिक टर्मिनस संकल्पनेला छेद देत वस्त्यावर ट्रक टर्मिनस विकसित केले जाणा रअसल्याचे आश्वासन अंदाजपत्रक देण्यात आले आहे. तसेच प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवर लॉजिस्टिक प्रस्तावित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com