Nashik : रिंगरोडसाठी महापालिकेकडून अडीचपट टीडीआरचा प्रस्ताव?

Nashik Ring Road
Nashik Ring RoadTendernama
Published on

नाशिक (Nashik) : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाथर्डी फाटा येथून नाशिकरोडमार्गे आडगाव आणि आडगावमार्गे म्हसरुळ, मखमलाबाद, मातोरी, गंगापूररोड, बारदान फाटा येथून पुन्हा गरवारे असा ५६ किलोमीटरचा रिंगरोड तयार करण्यासाठी जवळपास २६८ हेक्टर जागा लागणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य सरकारने निधी देण्याच्या मागणीला सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे महापालिकेने या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना रोख मोबदल्याऐवजी अडीचपट टीडीआर देण्याबाबत विचार सुरू केला आहे.

Nashik Ring Road
मुंबई महापालिकेची दंड ठोठावलेल्या ठेकेदारावर 300 कोटींची खैरात

महापालिकेने भूसंपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना टीडीआर देण्याचा निर्णय घेतल्यास ६७ लाख चौरस मीटर टीडीआर द्यावा लागणार आहे. यामुळे टीडीआरचे दर कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता असून त्यातून मागील सिंहस्थाप्रमाणेच भूससंपादनाचा प्रश्‍न रेंगाळण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने रस्त्यांसाठी लागणाऱ्या भूसंपादनाचा अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

Nashik Ring Road
Sambhajinagar: 'त्या' रेखांकनातील TDR आणि बांधकाम परवाना अखेर रद्द

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराबाहेरून जाणाऱ्या अनुक्रमे ३६ मीटर व ६० मीटर रुंदीच्या रिंगरोडच्या प्रस्तावाला वेग आला आहे. अवजड वाहनांना शहरांमध्ये थेट प्रवेश न देता थेट मुंबई किंवा मध्य प्रदेशकडे जाता यावे या दृष्टिकोनामधून रिंगरोड प्रस्तावित करण्यात आले आहेत. महापालिकेची अर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर रिंगरोड पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. भविष्याचा विचार केल्यास रिंगरोड महत्त्वाचे असल्याचे शासनालाही पटवून दिले गेले. मात्र, सरकारने अद्याप भूसंपादनासाठी निधी देण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. सिंहस्थासाठी आता केवळ चार वर्षे उरले असून या कालावधीत भूसंपादन होऊन रिंगरोड उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, भूसंपादनापोटी रोख मोबदला देण्याजोगी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे पाचपट टिडीआ रदेण्यासारख्या प्रोत्साहनपर योजनेतून जागासंपादन करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी लकडा लावला होता. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाच्या नाशिकरोड येथील नगररचना कार्यालयाने एक नकाशा तयार करून दोन्ही रिंगरोडचा मार्ग कसा असेल याची माहिती मागवली होती. त्यानुसार महापालिकेने अहवाल तयार केला असून ६० मीटर रिंगरोडसाठी साधारण १५८हेक्टर , तर ३६मीटर रिंगरोड साठी १०९ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे.

Nashik Ring Road
Nashik DPC:रस्त्यांची 35 कोटीची कामे रद्द मग जनसुविधेच्या कामांचे?

असा आहे ३६ मीटरचा रिंगरोड
आडगाव ट्रक टर्मिनससमोरून ३६ मीटर रिंगरोडची सुरुवात होईल. पुढे आडगाव, म्हसरुळ, मखमलाबाद, मनपा हद्दीबाहेर जलालपूर - बारदान फाटा - गंगापूररोड क्रॉस करून गंगापूर उजवा तट कालवा - सातपूर एमआयडीसीच्या पश्चिम हद्दी- त्र्यंबकरोड-  नंदिनी नदी ओलांडून अंबड एमआयडीसी- गरवारे रेस्ट हाउस- मुंबई- आग्रा महामार्ग

असा आहे ६० मीटरचा रिंगरोड
मुंबई-आग्रा  महामार्गा-खत प्रकल्प येथून- पाथर्डी  शिवार- पिंपळगाव खांब शिवार- वालदेवी नदी ओलांडून विहितगाव शिवार- नाशिक-पुणे महामार्ग- पंचक- गोदावरी नदी- माडसांगवी शिवार -छत्रपती संभाजीनगररोड ओलांडून आडगाव शिवार-  ट्रक टर्मिनस- मुंबई-आग्रा महामार्ग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com