चक्क घरपट्टी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यासाठी काढले टेंडर

Band Pathak
Band PathakTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी नाशिक महापालिकेने थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ढोल पथक नेमण्यासाठी महापालिका टेंडर प्रक्रिया राबवली असून लवकरच महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये या ढोल पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Band Pathak
शिंदे साहेब, निर्णय कधी घेणार? 400 कोटींचा 'हा' प्रस्ताव धूळखात...

नाशिक महापालिकेची घरपट्टी व पाणी पट्टी थकबाकी 500 कोटींच्या वर गेली आहे. अपेक्षित थकबाकी वसूल होत नसल्याने उद्दिष्ट पूर्तीसाठी कर विभागाने पुन्हा मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बडविण्याचे जुने हत्यार बाहेर काढले आहे. दरवर्षी ढोल बजावण्याचा फंडा वापरण्याची घोषणा होते, मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. त्यामुळे विविध कर विभागाची ही कृती फक्त घाबरवण्यासाठी असल्याची सवय थकबाकीदारांना झाली आहे. मात्र, यावेळी महापालिकेने केवळ घोषणा केली नसून ढोल वाजवण्यासाठी ढोल पथक नियुक्त करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे.

Band Pathak
'त्या' 8 ठेकेदारांना नाशिक महापालिकेचा दणका; 6 कोटींच्या बिलातून..

महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून मागील आठवड्यात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला. त्यात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती समोर आली. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले 3245 थकबाकीदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर थकबाकी दारांकडून वसुली करण्यासाठी अंतिम नोटीसा बजावण्यात आल्या. त्यास अपेक्षित उत्तर न मिळाल्यास 15 सप्टेंबरपासून थकबाकी वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर नाशिक ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे.

ढोल पथकांसाठी टेंडर प्रक्रिया

गणेश उत्सव व नवरात्र उत्सवानिमित्त ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यात नाशिक ढोलला संपूर्ण राज्यातून मागणी वाढत असताना आता महापालिकेने थकबाकी वसुली करण्यासाठी सहा विभागात ढोल पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. ढोल वादन होत असताना त्याचे छायाचित्रण देखील केले जाणार असून जिओ टॅगिंग केले जाणार आहे.

विभागनिहाय थकबाकीदारांची संख्या(एक लाख पेक्षा अधिक)

पूर्व विभागात 1015

पश्चिम विभागात 646

नाशिक रोड विभागात 405 सातपूर विभागात 198

सिडको विभागात 316

पंचवटी विभागात 639

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com