Nashik : 333 स्पीडब्रेकर्स बसविण्यास सुरवात; फेब्रुवारीत 50 बसविणार

Speed Breaker
Speed BreakerTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेने शहरात रहदारीच्या मोठ्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर्स बसवण्याचा निर्णय झाला असून आता ३३३ पैकी पहिल्या टप्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत ५० ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर्स बसवण्याचे काम सुरू झाले आहे. एप्रिल महिन्याअखेरपर्यंत ३३३ स्पीड ब्रेकर लावण्यात येणार असून मेमध्ये या स्पीडब्रेकर्सची चाचणी घेतली जाणार आहे. यामुळे जवळपास मागील दीड वर्षांपासून शहरातील मिर्ची चौकातील अपघातानंतर उपाययोजना म्हणून स्पीडब्रेकर्सच्या पर्यायाची अखेर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Speed Breaker
Nashik : फाळके स्मारक विकासासाठी निधी मंजुरीआधीच सल्लागार नेमण्याची घाई का?

नाशिक शहरातील छत्रपती संभाजी महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या बस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पीड ब्रेकर बसविण्याची शिफारस केली होती. तसेच यापूर्वी अशाच पद्धतीच्या मागणीचे जवळपास साडेपाचशे प्रस्ताव पालिकेकडे भिजत पडल्याचे समोर आले होते. त्यामुळे स्पीड ब्रेकरच्या प्राप्त प्रस्तावांची तपासणी व छाननी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची उपसमिती गठित करण्यात आली होती.

Speed Breaker
Nashik : लोकसभा निवडणुकीपूर्वी 'समृद्धी'ची मिळणार आणखी एक गुड न्यूज!

या समितीत महापालिकेचा उपअभियंताप्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेचा प्रत्येकी एका अधिकाऱ्यासमवेत के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने या सर्वांचा समावेश होता. या उपसमितीने ३३३ ठिकाणी स्पीड ब्रेकर्ससह विविध उपाययोजना करण्याची शिफारस केल्यानंतर या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी ३३३ स्पीड ब्रेकर बसवले जाणार आहेत. शहरातील सहाही विभागांत किमान फेब्रुवारीअखेर ५० स्पीड ब्रेकर बसवून कार्यान्वित करण्याच्या सूचना बांधकाम विभागाने ठेकेदारास दिल्या आहेत.  मेमध्ये या स्पीडब्रेकर्सची चाचणी घेतली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com