Nashik : 250 कोटींचा उड्डाणपूल रद्द करून रस्त्यांचा विकास होणार

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationTendernama
Published on

नाशिक (Nashik) : शहरातील मायको सर्कल व उंटवाडी या ठिकाणी प्रस्तावित केलेले दोन उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे या उड्डाणपुलासाठी तरतूद केलेला निधी शहरातील रस्ते विकासासाठी वापरण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते. यावर्षाच्या अंदाजपत्रकात रस्ते विकासासाठी पुरेसा निधी नसल्याने या उड्डाणपुलाचा निधी रस्त्यांवर खर्च करण्याबाबत विचार सुरू आहे.

Nashik Municipal Corporation
वाह रे ठेकेदार! मोदींनी लोकार्पण केलेला रस्ता पहिल्या पावसातच...

शहरात २०२० मध्ये उंटवाडी आणि मायको सर्कल या दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, या उड्डाणपुलांची गरज नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यात कोरोना महामारीचा काळ असल्याने तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी  काटकसरीच्या धोरणानुसार या दोन्ही उड्डाणपुलांचा फेरआढावा घेतला होता. या पुलांच्या व्यवहार्यतेबाबत मुंबईतील आयआयटीकडून अहवाल मागविला. अहवाल आल्यानंतर एका पुलाचा प्रस्ताव रद्द करीत त्यासाठी तरतूद केलेला निधी आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रस्त्यासाठी प्रस्तावित करता येईल का, याचा विचार महापालिका यंत्रणेकडून सुरू आहे. उड्डाणपूल रद्द झाल्याने साधारण २५० कोटीचा निधी उपलब्ध होणार असून या निधीतून रस्त्यांचे काम करण्याचा विचार सुरू आहे. 

Nashik Municipal Corporation
Nashik ZP : कामे रद्द झाल्याने प्रशासन सुटले अन् ठेकेदार अडकले

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होणार असून तत्पूर्वी शहरातील रस्त्यांचे जाळे व अंतर्गत रिंगरोड विकसित करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याच्या कामांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. यावेळी रस्ते विकासासाठी सातशे कोटींचा निधी खर्च होण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती बघता, एवढा निधी उपलब्ध होणे अवघड असल्याने या रद्द उड्डाणपुलाचा निधी रस्त्यांसाठी वापरला जाऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com