नाशिक (Nashik) : महापालिकेने नुकत्याच झालेल्या महासभेत सेवा व प्रवेश नियमावलीला मंजुरी देताना ११ विभागांमधील बिगारी संवर्गातील ३६२ पदे रद्द केली आहेत. घनकचरा व्यवस्थापनमधील ८४ पदांसह इतर विभागांमधीलही काही पदे रद्द करतानाच जवळपास अडीचहजार नवीन पदांनाही मंजुरी दिली आहे. काळाची गरज ओळखून आवश्यकता नसलेली पदे रद्द करण्यात आली असून, भविष्यात अधिक आवश्यकता असलेल्या पदांच्या संख्येत वाढ केल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
महापालिकेने महाभसेत सेवा व प्रवेश नियमावलीला मंजुरी देताना कालबाह्य ठरणारी जवळपास ५११ पदे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये बिगारी संवर्गातील ३६२, खत प्रकल्पावरील विविध संवर्गातील ८४, नाट्यगृह विभागातील रंगमंच सहाय्यकाची तीन पदे, जलतरण तलावातील हेल्थ सेंटर कोचचे एक, अभियांत्रिकी (स्थापत्य) विभागातील सहा, अभियांत्रिकी विभागातील सर्वेअरची सहा, ऑटो इलेक्ट्रिशियनएक, वेल्डर २, ऑइल मन तीन, पंप चालक एक, मोटर क्लीनर ६, बोअर अटेंडंट १६, फिल्टर प्लांट ऑपरेटर एक, अभियांत्रिकी विद्युत विभागातील टेलिफोन ऑपरेटर दोन, झेरॉक्स ऑपरेटरचे दोन, वैद्यकीय आरोग्य विभागातील गंगापट्टेवाले ४, विभागीय स्वच्छता निरीक्षकाचे १२, लिफ्टमॅन तीन, ब्लॉक लेवल सुपरवायझरचे एक, प्रशासकीय सेवा विभागातील सांख्यिकी अधिकारी यांचा समावेश आहे. या पदांना सरकारी मान्यता नाही. त्यामुळेही पदे कायमची रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पदांना मंजुरीॉ
सुरक्षारक्षक पदामध्ये वॉचमन संवर्गातील ११६ पदे समायोजित करण्यात आली. माळी संवर्गातील साठ अतिरिक्त पदांची शिफारस करण्यात आली. सद्यस्थितीत माळी संवर्गातील ६४ पदे मंजूर आहेत. अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी) विभागातील श्रेणी ३ संवर्गातील १२ पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. गंगापट्टेवाल्याची दहा मंजूर पदे आहेत. त्याऐवजी सफाई कामगार संवर्गातील सहा पदे मंजुरीची शिफारस शासनाकडे केली जाणार आहे.