नाशिक (Nashik) : शहरात महारेल, निओ मेट्रो व सिटी लिंक यांच्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकपासून जवळच 42 मजल्यांचा मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारला जाणार आहे. या मल्टिहबचा उपयोग मेट्रो, हाय स्पीड रेल्वे आणि शहर बस सेवा यांना जोडण्यासाठी होणार आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला स्टेशनवाडी असून2 त्याच्या लगत महापालिकेची अकरा एकर जागा आहे. या जागेवर शहर बस सेवेसाठी बसडेपो उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सिटी लिंक कंपनीच्या बस डेपोचे काम सुरू असताना नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग उभारणाऱ्या महारेल कंपनीने त्यांचा1 रेल्वे मार्ग या जागेवरून जाणार असल्याने या जागेची मागणी केली आहे. महापालिकेच्या दृष्टीने बस डेपो महत्वाचा असल्याने त्यांनी एकत्र येऊन तेथे ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान निओ मेट्रो प्रकल्पही या ठिकाणापर्यंत येत आहे. यामुळेनिओ मेट्रोने येथे मेट्रो स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महारेलची 18 एकर व महापालिकेच्या 11 एकर जागेवर मल्टीमोडल हब करून त्यात मेट्रो निओला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यास आला. या बैठकीस निओ मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, महारेलचे सल्लागार अशोक गरुड, महापालिका शहर अभियंता शिवकुमार वंजारी, सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके आदी उपस्थित होते.
असा उभारणार हब
महारेल कंपनीकडून मल्टिमोडल हबसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिका प्रकल्पासाठी जागा देणार आहे. महापालिकेची जागा असल्याने ते जागा व पायाभूत सुविधा उभारणार आहेत. महारेल कंपनी 42 मजल्यांचा मल्टी मॉडेल हब उभारला जाणार आहे.