Nashik : खासगी इमारतींवरील मोबाईल टॉवर होणार बंद; महापालिका 'अशी' करणार वर्षाला 22 कोटींची कामाई

Nashik
NashikTendernama
Published on

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या विविध कर विभागाने उत्पन्न वाढवण्यासाठी स्वमालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोबाईल टॉवरसाठी ५०० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून आतापर्यंत  ३० टॉवरसाठी जागा दिल्या आहेत. या टॉवरच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाला २२ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

Nashik
Devendra Fadnavis : फडणवीसांची मोठी घोषणा; 'त्या' 67 हजार उमेदवारांना देणार नोकरी

मोबाईल कंपन्या खासगी इमारतींवर टॉवर उभारणी करतात. मात्र, खासगी इमारतींवरील मोबाईल टॉवर मोजण्याबरोबरच कर लावताना येणाऱ्या अडचणी येतात. यामुळे स्वमालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खासगी जागांवरील मोबाइल टॉवर हटवले जाणार आहेत.

संपर्कासाठी मोबाईल व नेटवर्कचे महत्त्व वाढले आहे. मात्र, मोबाईल टॉवरच्या अपुऱ्या संख्येमुळे नेटवर्क मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी असतात. यामुळे मोबाईल कंपन्या खासगी इमारतींवर अथवा खासगी मोकळ्या जागांवर टॉवर उभारणी करतात. यामुळे नाशिक शहरात खासगी जागांवर जवळपास ८०६ मोबाईल टॉवर असल्याचे महापालिकेला पाहणीत आढळून आले असून, त्यातील परवानगी घेतलेल्या मोबाईल टॉवरची संख्या अत्यल्प आहे.

Nashik
Karjat CSMT via Panvel : पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुसाट; 'हा' आहे मुहूर्त

मोबाईल टॉवर उभारण्याबाबत शासनाने नियमावली निश्चित केलेली नाही. यामुळे महापालिकेला त्यावर कारवाई करण्यात अडचण निर्माण झाली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी न घेता मोबाईल टॉवर उभारलेल्या जागा मालकांना नोटीस पाठवून परवानगी घेण्याबाबत कळवले. यामुळे अधिकृत टॉवरसाठी २४० प्रस्ताव दाखल झाले. त्यातील १६७ टॉवर नियमित करण्यात आले.

मात्र, नगररचना विभागाला नोटीस देण्यापलीकडे अधिकार नसल्याने परवानगी न घेतलेल्या जागा मालकांबाबत महापालिका काहीही कारवाई करू शकत नाही. तसेचपरवानगी न घेतलेले टॉवर सील करण्याची परवानगीन्यायालयाने दिलेली  नाही. यामुळे मोबाईल टॉवरबाबत महापालिकेचे हात बांधलेले असल्याचे दिसत आहे.

Nashik
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर का लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा?

दरम्यान पंधराव्या वित्त आयोगाने महापालिकेला उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे उत्पन्न वाढवल्याच्या तुलनेत १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळणार आहे. त्यानुसार उत्पन्न वाढविण्याचा भाग म्हणून महापालिकेकडून स्वमालकीच्या जागेवर ५०० मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रस्ताव आहे.

यामुळे उत्पन्न वाढवण्याबरोबरच शहरातील नागरिकांना 'फाइव्ह जी' (5G) सेवा मिळावी असा महापालिकेचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३० मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचे नियोजन आहे. मोबाईल टॉवर उभारणीनंतर प्रतिसाद लक्षात घेऊन मोबाईल टॉवर उभारले जातील. त्यानंतर खासगी इमारतींवरील मोबाईल टॉवर टप्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com