नाशिक (Nashik) : ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL) या सरकारी विमान निर्मिती कंपनीला 6 हजार 828 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. यातून एचएएल 70 एचटीटी 40 या प्रकारातील 60 ट्रेनर विमानांची निर्मिती करणार आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत माहिती दिली. वायुदलात दाखल झालेल्या नवीन वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी या विमानांचा वापर केला जाणार असून या विमानांचा वेग ताशी चारशे किलोमीटर असणार आहे.
ओझर येथील एचएएलमध्ये 1964 पासून विमाननिर्मितीचे काम केले जाते. ओझर येथ अखंड कनेक्टिव्हीटी व उपलब्ध मनुष्य बळाची संख्या लक्षात घेता व यापूर्वीचा विमान निर्मितीचा अनुभव लक्षात घेऊन या विमान निर्मितीचे काम ओझरच्या एचएएला कंपनीला मिळावे, यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ओझरच्या एचएएल ला 60 विमानांची निर्मिती करण्यासाठी मंजूरी दिली आहे.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, न्यू इंडिया 2022 रणनिती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. एचएएल नाशिक कंपनीत यापूर्वी अनेक लढाऊ विमाने व इतर प्रकारच्या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकची एचएएल विमान बनविणारी कंपनी नेहमीच नव्या प्रयोगशील विमानांच्या निर्मितीसाठी सज्ज असते.
वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले 70 एचटीटी 40 प्रकाराची ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएल देण्याचा निर्णय संरक्षण विमानाने घेतला आहे. या निर्णयामुळे एचएएल प्रशासनाने समाधान व्यक्त करत निर्णयाचे स्वागत केले आहे.
एचएएल ओझर येथे 60 विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 6828 कोटींचा निधीला मंजूरी देण्यात आली आहे. वायु दलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना या ट्रेनर विमानाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचा ताशी वेग 400 कि.मी. असणार असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्टानुसार हे विमान हे पूर्णत: भारतीय बनावटीचे असणार आहे.
- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री